नवी मुंबई : नाकाबंदी दरम्यान रस्त्यात सापडलेले पैशाचे पाकीट संबंधिताला सन्मानाने परत देण्याची कामगिरी रबाले पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी केली आहे.
17 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता नाकाबंदी दरम्यान रबाले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील आणि पोलीस हवालदार देशपांडे यांना रस्त्यात एक पैशाचे पाकीट पडलेले निदर्शनास आले. यावेळी त्यांनी पाकीटाची तपासणी केली असता त्यात रोख 59 हजार 360 रुपये आणि व्हिजीटींग कार्ड मिळून आले. सदर व्हिजीटींग कार्ड महेश सुर्वे नामक व्यक्तीचे असल्याने त्यावरील मोबाईलवर संपर्क साधून पोलिसांनी खातरजमा केली. यानंतर महेश सुर्वे यांना त्यांचे पैशाचे पाकीङट परत घेण्यासाठी रबाले पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. त्यानुसार रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील आणि पोलीस हवालदार यांनी महेश सुर्वे यांना त्यांचे पाकीट पैशासह सुपूर्द केले.