आमदार संदीप नाईक यांच्या लक्षवेधी स्ाूचनेवर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे उत्तर
नागपूर : राज्यातील पाळणा घरांमधून ठेवण्यात येणार्या बालकांच्या सुरक्षितते संदर्भात आमदार संदीप नाईक यांनी शनिवारी विधानसभेमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लक्षवेधी सूचना मांडली असता पाळणाघरातील मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक नियमावली महिला आणि बाल कल्याण खात्यामार्फत तयार केली जाईल असे उत्तर गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांनी या लक्षवेधीवर बोलताना दिले.
खारघरच्या सेक्टर १० मध्ये असलेल्या पूर्वा-डे-केअर या प्लेस्कूल मध्ये १० महिन्यांच्या बाळाला प्लेस्कूल मधील आया अफसाना शेख हिने अमानुषपणे मारहाण केल्याचे धक्कादायक प्रकरण अलिकडेच उजेडात आले आहे. त्यामुळे अशा पाळणाघरांची नोंदणी, त्याचे नियमन आणि या पाळणाघरांमधून ठेवण्यात येणार्या बालकांच्या सुरक्षिततेबाबत धोरण तयार करण्याची आवश्यकता या लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून आमदार संदीप नाईक यांनी शनिवारी मांडली. त्याचबरोबर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आय.टी. पार्क आहेत. नव्याने अनेक आय.टी. पार्क उभे राहत आहेत. या आय.टी. पार्कमध्ाून आणि इतर औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणार्या महिला कर्मचार्यांना पाळणा घरांची आवश्यकता आहे. त्यामुळे या औद्योगिक वसाहतीमधील व्यवस्थापणांना महिला कर्मचार्यांकरीता पाळणा घरांची निर्मिती करणे कायद्याने बंधनकारक करावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी या लक्षवेधी सूचनेवर बोलताना केली. त्यावर आ. नाईक यांची सूचना योग्य असल्याचे नमूद करून पाळणाघरांमधील मुलांच्या सुरक्षिततेसाठी महिला आणि बालकल्याण खात्यामार्फत नियमावली तयार केली जाईल, असे आश्वासन गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांनी आ. नाईक यांना दिले. स्मार्ट शहरांच्या दिशेने प्रवास करीत असताना पाळणा घराबाबतचे धोरण तयार करणे काळाची गरज असल्याचे गृहराज्य मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. या लक्षवेधीच्या लेखी उत्तरात नवी मुंबई क्षेत्रातील पाळणा घरांमधील मुलांच्या सुरक्षिततेबाबत उपाय योजना आहेत का? याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.