नवी मुंबई : सिडको अर्बन हाट, सी.बी.डी. बेलापूर येथे दि.16 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2016 या कालावधीत राष्ट्रीय हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसापासून या प्रदर्शनाला भेट देणार्यांच्या संख्येत वाढ झाली असून विक्रीदेखील बर्यापैकी झाल्याची माहिती कारागिरांकडून देण्यात येत आहे.
या प्रदर्शनात 13 राज्यातील 80 पेक्षा जास्त कारागिर सहभागी झाले आहेत. हे प्रदर्शन वस्त्रोद्योग मंत्रालय नवी दिल्ली व विकास आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे.
या प्रदर्शनात हस्त कलेच्या वस्तू, भरतकाम केलेल्या साडया, ज्युटच्या वस्तू, बांबू फर्निचर, लाकडी वस्तू, लेदरच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, बुट, खेळणी, ड्रेस मटेरीयल, साडी, बेडशीट, कारपेट, पडदे इत्यादी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या प्रदर्शनात आंध्रप्रदेश, छत्तीसगड, अरुणाचलप्रदेश, गोवा, तामिळनाडू, पश्रि्चम बंगाल, झारखंड, आसाम, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, ओरीसा, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, आदी राज्यातील कारागिरांनी बनविलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री असणार आहे.
सिडको भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेले हे तिसरे हस्तकला प्रदर्शन आहे. सिडको अर्बन हाटमध्ये आतापर्यंत 106 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये 23 राज्यातील 9 हजारपेक्षा जास्त कारागिरांनी सहभाग नोंदविला आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे व्यवस्थापक,सिडको अर्बन हाट, नवी मुंबई यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.