शिवसाई मित्र मंडळ आयोजित हळदी कुंकू समारंभाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
नवी मुंबई – महिलांची शक्ती जिथे एकत्र येत असते तेथे नेहमीच इतिहास घडत असतो. त्यामुळे महिला शक्ती नेहमी एकत्र आली पाहिजे असे उदगार बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी गुरुवारी सानपाडा येथे काढले.शिवसाई मित्र मंडळाच्या वतीने दशकपूर्ती साईउत्सव 2017 निमित्त सानपाडा सेक्टर 7 येथे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार मंदा म्हात्रे बोलत होत्या.आमदार मंदा म्हात्रे यांनी महिलांशी संवाद साधला व महिलांना हळदी कुंकूच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी व्यासपीठावर स्थानिक शिवसेना नगरसेविका ऋचा पाटील,शिवसेना उपविभाग प्रमुख रामचंद्र पाटील,शिवसाई मित्र मंडळाचे अध्यक्ष विवेक भालेराव,सचिव गणेश पावगे,खजिनदार दिलीप खैरे,उपाध्यक्ष विश्वास कणसे,उपाध्यक्ष रईस खान,सहसचिव रुपेश घाडगे,सहसचिव विकास चव्हाण,सहखजिनदार दत्तात्रय गोरडे,सहखजिनदार सुहास घाडगे,सल्लागार महावीर बाफना,सल्लागार पांडुरंग आमले, सल्लागार संजय डाकवे,सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण,सानपाडा युथ फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश शेटे,सामाजिक कार्यकर्ते नवनाथ पोळ, धर्मेश पाटील उपस्थित होते.हळदी कुंकूचे महत्व आणि हिंदू संस्कृती व हिंदू परंपरा याबाबत सनातन संस्थेच्या प्रवक्त्या नयना भगत यांनी महिलांना प्रबोधन केले.यावेळी महिलांना घरगुती वापरातील वस्तू आणि वाण वाटप करण्यात आले.प्लास्टिक मुक्त नवी मुंबई ही संकल्पना राबवण्यासाठी महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करून महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली.यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील सिने कलाकारांनी संगीत खुर्ची व बादलीत बॉल टाकणे यांसारख्या विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांचे मनोरंजन केले.विजेत्या स्पर्धकांना मानाची पैठणी व आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.यावेळी हजारो महिलांनी हळदी कुंकू समारंभाचा लाभ घेऊन स्पर्धेत सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष विवेक भालेराव यांनी केले.