नवी मुंबई : नवी मुंबईतील मंदिरावर सिडको, महानगरपालिका, MIDC ने तोडक कारवाई सुरु केली आहे. नवी मुंबईतील मंदिरावर होणारी हि तोडक कारवाई त्वरित थांबवावी यासाठी नवी मुंबईतील श्री नागाई सामाजिक सेवा ट्रस्ट, संत जगतगुरू तुकाराम महाराज वारकरी मंडळ, नवी मुंबई , संत ज्ञानेश्वर माउली वारकरी मंडळ, श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ, हिंदू जनजागृती समिती, श्री शिव प्रतिष्ठान (हिंदुस्थान) अशा अनेक वारकरी संप्रदाय यांनी बुधवार दि. 15.02.2017 रोजी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे समस्या मांडली. तसेच मंदिरावर होणारी तोडक कारवाई त्वरित थांबविण्यासाठी हि बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी अशी विनंती उपस्थित वारकरी संप्रदायाने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केली. नवी मुंबईतील सर्व मंदिरे नियमित करण्यासंदर्भात शासन दरबारी पत्रव्यवहार सुरु असून मंदिरांवर होणारी तोडक कारवाई थांबविण्यात येऊन हि सर्व मंदिरे नियमित केली जातील, असे आश्वासन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले.
याप्रसंगी युवा फाउंडेशनचे मंगेश म्हात्रे, वारकरी मंडळाचे सोपान म्हात्रे, निलेश कुलकर्णी, सुनील रानकर, रमण पाटील, बबन नाईक तसेच इतर वारकरी दिंडी चालक उपस्थित होते.