आगरी कोळी यूथ फाऊंडेेश तर्फे प्रकल्पग्रस्तांना आवाहन.
साईनाथ भोईर
नवी मुंबई : गावठाण आणि विस्तारित गावठाणांचा तसेच प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली चाळीस वर्ष प्रलंबित आहेत. आणि अनेक वर्ष सदर प्रश्न सुटण्याची प्रतीक्षा प्रकल्पग्रस्त आजही करीत आहेत. परंतु प्रश्न सोडवण्याऐवजी प्रश्न अधिक गंभीर करण्यामागे प्रशासनाचा उद्देश असल्याचे गेल्या काही महिन्यातील घडामोडींवरून स्पष्ट पहावयास मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे.
ग्रामस्थांनी गरजेपोटी केलेल्या बांधकामांवर गावठाणांमध्ये तोडक कारवाई सुरूच आहे, नवी मुंबई मनपा हद्दीतील प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना विद्यावेतन बंद करण्यात आले आहे, कंत्राटी पद्धतीमध्ये नोकरीत असणार्या प्रकल्पग्रस्त तरुणांना नोकरीतून काढण्याचा नुकताच प्रयत्न झाला होता आणि येणार्या काळात आगरी-कोळी प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांच्या मुळावर प्रशासन उठण्याची शक्यता नाकरता येणार नाही. त्यामुळे शासन आणि प्रशासनाला खंबीर पणे सामोरे जाऊन आपले प्रश्न सोडवणे गरजेचे असून त्यासाठी तळागाळातून संघटीत प्रयत्न होणे गरजेचे आहे. आगरी कोळी यूथ फाउंडेशन हे शिवधनुष्य उचलायला तयार आहे . त्यासाठी या संदर्भातील दिशा आणि रणनीती ठरवण्यासाठी आगरी-कोळी युथ फाउंडेशन ची जाहीर सभा शुक्रवार 17 फेब्रुवारी ,शेतकरी समाज मंदिर कोपरखैराणेे येथे सायंकाळी साडे सहा वाजता आयोजित केली असून या मधे प्रकल्पग्रस्तानी मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन आगरी कोळी यूथ फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.