साईनाथ भोईर
नवी मुंबई :- बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईतील सुमारे 1600 मच्छिमारांना बायोमॅट्रिक कार्डचे वितरण करण्यात आले होते. तसेच नवी मुंबईतील सर्व मच्छीमारांना बोटीसाठी लागणारे VRC म्हणजेच कौल नोंदणी प्रमाणपत्र मिळावे, याकरिता काही दिवसांपूर्वी वाशी येथील मार्गदर्शनपर शिबीर आयोजित करण्यात आले होते व त्या शिबिरात मच्छिमारांना बोटीसाठी लागणारे VRC म्हणजेच कौल नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार बुधवार दि.15.02.2017 रोजी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी VRC नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली. बोटीसाठी लागणाऱ्या VRC नोंदणी करून घेण्याकरिता नवी मुंबईतील शेकडो मच्छिमारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. मच्छीमारांना पूर्वी VRC नोंदणी करण्याकरिता पालघर येथे जावे लागत होते. त्यामुळे मच्छीमारांना खूप त्रास सहन करावा लागत होते. परंतु आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सततच्या प्रयत्नामुळे हे काम सोईस्कर झाल्यामुळे मच्छिमारांनी याबद्दल आनंद व्यक्त करून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले.