साईनाथ भोईर
नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 4 जानेवारीपासून संपूर्ण देशातील सुमारे 500 शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण-2017 सुरू आहे. देशातील शहराचा स्वच्छतेबाबत दर्जात्मक व गुणात्मक सुधारणा करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत Swachhta-MoUD App कार्यान्वित केले आहे. सदरॲपच्या माध्यमातून नागरिकांना दैनंदिन स्वच्छता विषयक नऊ प्रकारच्या तक्रारी नोंदविण्याची तसेच सदर तक्रारीचे निराकरण झाल्यावर अभिप्राय नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर स्वच्छता ॲपची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरीता स्वच्छ सर्वेक्षण-2017 अंतर्गत 28/02/2017 पर्यंत संबंधित शहरांतर्गत डाऊनलोड करण्यात आलेल्या स्वच्छता ॲपच्या संख्येनुसार संबंधित शहरास गुणांकन प्राप्त होणार आहे.
त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे,अतिरिक्त आयुक्त (शहर) अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त (सेवा) रमेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली तसेच परिमंडळ-1 चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे उप आयुक्त तुषार पवार यांचे नियंत्रणाखाली 27 व 28/02/2017 रोजी नेरूळ विभागातील डी. वाय. पाटील कॉलेज, हॉटेल मॅनेजमेंट,मेडिकल कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेज, एम.बी.ए. कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून स्वच्छता ॲप डाऊनलोड करून घेणेकरीता डी. वाय. पाटील स्टेडियम परिसरात विशेष मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेमध्ये डी. वाय. पाटील कॉलेज विद्यार्थी व कर्मचारी मोठ्यासंख्येने उत्फुर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे परिमंडळ-1 चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांचे प्रमुख उपस्थितीत उप अभियंता जितेंद्र रावळ, कनिष्ठ अभियंता निखिल काळे, नितीन जाधव,स्वच्छता निरिक्षक नवनाथ ठोंबर, श्रीम. कविता खरात, स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षातील कर्मचारी हेमंत चं. पाटील, अंकित मढवी, संतोष पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता ॲप डाऊनलोड करून कार्यान्वित करणेकरीता मार्गदर्शन केले.