साईनाथ भोईर
नवी मुंबई : श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव-2017 चे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नुकतेच सीबीडी बेलापूर येथील सुनील गावस्कर मैदान येथे संपन्न झाले.
बेलापूरच्या लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार सौ. मंदाताई म्हात्रे गेली 21 वर्षापासून सामाजिक सेवा संस्थेच्या माध्येमातून विविध सामजिक कार्याबरोबरच येथील नागरिक, विद्यार्थी व महिला यांच्या सुप्त कला गुणासाठी नवी मुंबई कला क्रीडा महोत्सवाचे यंदाही करीत आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
26 फेब्रुवारी पासून ते 7 मार्च या दरम्यान श्री. गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने सी.बी.डी. बेलापूर येथे नवी मुंबई कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवात आरोग्य शिबीर, नाट्य, संगीत, चित्र व पाककला अद्य विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून संस्थेचे अध्यक्ष सौ. मंदाताई म्हात्रे संस्थेच्या माध्यमातून अनेक सामजिक उपक्रम विविध सामजिक समस्यांचे निराकरण व लोकापयोगी कामे करीत आहे.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. मंदाताई म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कला क्रीडा महोत्सवाचे उद्देश सांगितले. सदर कार्यक्रमास महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाबरोबर छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी आर.पी.आय. महाराष्ट्र सचिव महेश खैरे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मारुती भोईर, आर.पी.आय. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्राम ओव्हल, डॉ. राजेश पाटील, दत्ता घंगाळे, विक्रम पराजुली, प्रसिद्ध उद्योजक डॉ. दीपक बैद, संपत शेवाळे, कृष्णा पाटील, दीपक पवार, विकास सोरटे तसेच इतर मान्यवर व मोठ्या प्रमाणात महिला वर्ग तसेच नागरिक उपस्थित होते.