भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांचे प्रतिपादन
कल्याण : प्रतिनिधी
वंशाच्या दिव्याच्या अट्टहासापोटी स्त्रीभ्रूण हत्तेचे पातक घडत आहे, ही चिंतेची बाब आहे. या अनिष्ट विचाराला समूळ नष्ट करण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची आहे. वंशाच्या दिव्यापेक्षा अनेक परिश्रमातून आपल्या घराची ज्योत होऊन घराचे घरपण उजळवाणाऱ्या प्रत्येक महिलांना बचतगटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यासाठी कल्याण शहरात रोजगार निर्मितीची चळवळ आगामी काळात उभारणार असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी केले. कल्याण शहरातील आधारवाडी परिसरातील मंगल कलश सभागृहात मंगळवारी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित मोफत महिला उद्योग मार्गदर्शन शिबिरात उपस्थितीत महिलांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी बोलताना आमदार नरेंद्र पवार यांनी येत्या ८ दिवसात कल्याण शहरातील किमान १०० गरुजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.
महिला सक्षमीकरणासाठी बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला रोजगार मिळायला पाहिजे, तसेच लघु उद्योगातून महिलांना यशस्वी उद्योजिका म्हणून समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून कल्याण शहरात प्रथमच जगातिक महिला दिनाच्या औचित्याच्या निमित्ताने मोफत महिला उद्योग मार्गदर्शन शिबिराचे आयोजान करण्यात आले होते. यावेळी बोलताना आमदार नरेंद्र पवार यांनी आगामी काळात महिला बचत गटांच्या स्वरूपात रोजगार निर्मितीची चळवळ निर्माण करून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणार असल्याचे सांगितले. समाजात यशस्वी उद्योजिका म्हणून महिलांना लौकिक मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित महिला वर्गाला मार्गदर्शन करताना सांगितले. त्याच प्रमाणे यावेळी उद्योग मैत्रीण मासिकाच्या संपादिका तथा महिला उद्योगच्या प्रमुख मार्गदर्शक सारिका भोईटे – पवार यांनी उपस्थितीत महिलांना मार्केटिंग व्यवसाय, कमी भांडवलात उभे राहणारे घरगुती लघु उद्योग आदीबाबत मार्गदर्शन केले. अनेक यशस्वी महिला उद्योजिकांची उदाहरणे देत त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी संवाद महिलांशी साधला. यावेळी बोलतना आयोजिका तथा भाजपा महिला आघाडीच्या कल्याण शहर सरचिटणीस हेमाताई नरेंद्र पवार यांनी आगमी काळात आमदार नरेंद्र पवार यांच्या सहकार्यांने कल्याण शहरात महिला बचत गटांची निर्मिती करून अनेक महिला उद्योजिका निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.
दरम्यान यावेळी व्यासपीठ उद्योग मैत्रीण मासिकाच्या संपादिका तथा महिला उद्योगच्या प्रमुख मार्गदर्शक सारिका भोईटे – पवार, कार्यक्रमाच्या आयोजक भाजपा महिला आघाडीच्या कल्याण शहर सरचिटणीस हेमाताई नरेंद्र पवार, भाजपा महिला आघाडी उत्तर भारतीय सेलच्या उपाध्यक्ष निरजा मिश्रा, भाजपा नगरसेविका वैशाली पाटील, महिला बचत गट संघटक मायाताई कापडणे, भाजपा महिला आघाडी गुजराती सेलच्या प्रमुख नम्रता चव्हाण, भाजपा ठाणे विभाग सचिव मंगल वाघ, कल्याण शहर महिला आघाडी उपाध्यक्ष भाग्यश्री देसाई, अंबरनाथ जयहिंद बँकेचे संचालक नंदकुमार भोळे व भाजपा ठाणे विभाग चिटणीस राजाभाऊ पातकर आदी मान्यवर उपस्थित होते.