सुजित शिंदे
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सुशिक्षत – बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळावा ही संकल्पना नजरेसमोर ठेवून जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व दिनदयाळ अंत्योद्य योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दि.10 मार्च 2017 रोजी “भव्य रोजगार मेळावा व लाभार्थी नोंदणी अभियान” सकाळी 10 ते सायं. 05.00 पर्यंत कै. विमलताई धनाजी शिंदे बहुउद्देशीय इमारत, प्लॉट नं.40 बी, मॉडर्न कॉलेज समोर, सेक्टर 16, वाशी येथे आयोजित करण्यात आले आहे.

याव्दारे कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना नामांकित कंपन्यांमार्फत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार असून यामध्ये पात्रतेच्या अधीन राहून सरळ मुलाखतीव्दारे प्रत्यक्ष निवड व तात्काळ नियुक्ती पत्र दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे यावेळी कौशल्य प्रशिक्षण घेऊ इच्छिणा-यांसाठी VTP मार्फत समुपदेशन व मोफत कौशल्य प्रशिक्षणासाठी लाभार्थी नोंदणी केली जाणार असून करियर निवडीबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे.
या भव्य रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता इच्छुकांनी http://jobfair17.com या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. मेळाव्याच्या दिवशी आधारकार्ड, निवडणुक ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज 3 फोटो व बायोडाटा या प्रकारची कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. या भव्य मेळाव्यासंबंधित अधिक माहितीकरीता 8767085000 या टोल फ्री क्रमांकावर तसेच 022-27654140 / 022-40126301 / 02, 022-754053 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे.
तरी या भव्य रोजगार मेळावा व लाभार्थी नोंदणी अभियानात रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी व कौशल्य प्रशिक्षण घेऊ इच्छिणा-या जास्तीत जास्त तरूण – तरूणींनी दि.10 मार्च 2017 रोजी आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.