नवी मुंबई : इंडियन मेडिकल असोसिएशनने भारतात वाढत्या लोकसंखेबरोबरच वाढत असलेल्या हृदयविकारा संबंधी डॉक्टरांची कार्यशाळेचे नवी मुंबई- वाशी येथे आयोजित केले होते. या कार्यशाळेला शहरातील ७५ डॉक्टर्स उपस्थित होते. सध्या भारतात एक चतुर्थांश लोक हृदय विकाराने मृत्युमुखी पडतात आणि अकाली मृत्युसाठी हृयविकार हे प्रमुख कारण आहे. हृदय रोगाबद्दल लोकांमध्ये जागृतीचा अभाव असून अनेकाना त्याची कारणे देखील माहित नसतात. त्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक उपाय देखील वेळीच होत नाहीत.
हृदय विकारांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी आयएमएयुएसवीच्या बिनशर्त शैक्षणिक अनुदान कार्यक्रमा अंतर्गत अश्या कार्यशाळांचे पूर्ण भारतभर आयोजन करणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश हृदय विकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे हृदय विकारांबद्दल संबंधितांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढील सहा महिन्याचा कालावधीत 30 राज्ये आणि 1700शाखांच्या माध्यमातून 2.5 लाख सभासदांमध्ये हृदय विकारांबद्दल जागृती करण्यात येणार आहे.
सीएमई ला संबोधित करतांना डॉ राहुल गुप्ता, डॅरेन कार्डिओलॉजी आणि वरिष्ठ सल्लागार, अपोलो हॉस्पिटल म्हणाले, “गेल्या काही दशकांत भारतात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगी रुग्णांची संख्येत सातत्याने वाढ झाली आहे. परंतु सर्वात काळजी करण्यालायक गोष्ट म्हणजे यात महिला आणि तरुण रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हृदय रोगांच्या लक्षणांमध्ये छातीत दबाव, अनियमित हृदयाचे ठोके ,छातीत धडधडणे, चक्कर येणे, मळमळ आणि धाप लागणे इत्यादी लक्षणे मोडतात. ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. “
याला दुजोरा देतांना, एका संयुक्त वक्तव्यात पद्मश्री पुरस्कार विजेते आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ के के अग्रवाल आणि डॉ प्रफुल्ल केरकर सीएमई चे नॅशनल कोर्स समन्वयक, म्हणाले , “लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह या सारखे आजार हृदय रोगास कारणीभूत आहेत. ज्यांच्या कुटुंबात हृद्यरोगाचा त्रास आहे अशानी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब हा हृदय विकारासाठी घातक आहे.
डॉ एस कामत, मुख्य सल्लागार, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि डॉ अजीज म्हाते, अध्यक्ष, आयएमए, नवी मुंबई म्हणाले , ” उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा रक्तातील ग्लुकोजचे उच्च प्रमाण. शिवाय धूम्रपानाची सवय, एपीओबी / एपीओ ए1चे प्रमाण, उच्च रक्तदाबाचा इतिहास, मधुमेह, ओटीपोटाचा लठ्ठपणा, मानसिक घटक आणि नियमित मद्य सेवन हे हृदयरोगास निमंत्रण देत असतात. “