जनविकास प्रबोधिनी, वे टू हेल्थ व युनिक आय हॉस्पिटलचा उपक्रम
नवी मुंबई : कामाची वेळ नाही व खाण्यापिण्याला उसंत नाही या विवंचनेत पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराला कुटुंबाला तर सोडा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हाच धागा पकडून जनविकास प्रबोधिनी या सामाजिक संस्था व वे टू हेल्थ लॅब व युनिक आय हॉस्पिटलच्या माध्यमातून बुधवार दि.०८ मार्च २०१७ रोजी नवी मुंबईतील संपादक, पत्रकार, कॅमेरामन, छायाचित्रकार यांच्यासाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर नवी मुंबई मनपा पत्रकार कक्षात संपन्न झाले. या आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरात जवळपास ५३ पत्रकारांनी आपल्या विविध प्रकारच्या रक्त तपासण्या, नेत्र तपासणी तसेच हृदय तपासणी केल्याचे जनविकास प्रबोधिनीचे अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. सदर आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरास विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली.
या शिबिरावेळी स्त्री-मुक्ती संघटनेच्या नवी मुंबई अध्यक्ष व लेखिका वृशालीताई मकदूम, सामाजिक कार्यकर्ते व सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, टोल अभ्यासक संजय शिरोडकर, नवी मुंबई मनपा महापौर सुधाकर सोनावणे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक निलेश खरे, दैनिक जनशक्तीचे संपादक तुलसीदास भोईटे, दैनिक पुण्यनगरीचे संपादक संजय मलमे, तसेच मनोज जालनावाला, विकास महाडिक, दिनेश पाटील, निलेश पाटील, विनायक पाटील, शेखर हम्प्रास, मिलिंद तांबे, मनोज भिंगार्डे, शैलेश तवटे, सुजित गायकवाड, पूनम गुरव, अश्विनी जगताप, स्वप्नाली देसाई, सोनाल जाधव, संजय गुरव, सुदीप घोलप, शरद वाघदरे, मचीन्द्र पाटील, सुरेश दास, महादेव देशमुख, विक्रम गायकवाड, अशोक शेसवरे हे व इतर पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते.
पत्रकार हा लोकशाहीचा स्तंभ, मात्र प्रसिद्धी व वलय या बरोबरच हे क्षेत्र तेवढेच संघर्षात्मक व आव्हानात्मक. त्यामुळे आरोग्याची हेळसांड रोजचीच. हाच धागा पकडून जनविकास प्रबोधिनी व वे टू हेल्थ ने हा उपक्रम राबविल्याचे गजानन काळे यांनी म्हटले आहे. या शिबिरात 1.Complete Blood Count (CBC), 2.Hemoglobin, 3.RBC, 4.Total WBC Count, 5.DLC, 6.Platelet,7.Urine Routine, 8.Physical Examination, 9.Chemical Examination,10.Microscopic Examination, 11.Fasting Blood Sugar (After / Before),12.Blood group, 13.Serum Cholesterol, 14.TSH, 15.X-Ray Chest,16.ECG, 17.BP तसेच नेत्र तपासणी करण्यात आली.
यावेळी सहभागी पत्रकार व संपादक मंडळींनी या उपक्रमाचे कौतुक केले व पुढील काळात वेळोवेळी अशी आरोग्य तपासणी शिबिरं जनविकास प्रबोधिनीने राबवावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.