मनसेमुळे ५० वंचित आणि दुर्बल घटकातील पालकांच्या मुलांना नर्सरीमध्ये DPS ला प्रवेश मिळणार..
साईनाथ भोईर
़नवी मुंबई : मनसे आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्या तंबीमुळे DPS शाळेने RTE २५% अंतर्गत नर्सरीसाठी ५० वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांची यादी शाळेत लावली असून, उद्या या विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास DPS प्रशासनाने सांगितले आहे. मनसेने सातत्याने RTE २५% प्रवेशाबाबत नवी मुंबईत पाठपुरावा केल्यामुळे, नवी मुंबई मनपा शिक्षण विभागाने RTE २५% प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविली. मात्र RTE अंतर्गत प्रवेशास पत्र होऊनही कित्येक विद्यार्थ्यांना DPS शाळेने नर्सरीसाठी प्रवेश देण्यास नकार द्यायला सुरुवात केली होती. याबाबत मनसे कडे पालकांनी तक्रार केल्यानंतर, मनसे विद्यार्थी सेनेने मनपा शिक्षण अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.
या इशाऱ्यानंतर तात्काळ शिक्षण अधिकाऱ्यांनी DPS शाळेला नोटीस दिली होती की संबंधित विद्यार्थ्यांना RTE अंतर्गत प्रवेश द्या अन्यथा DPS ची मान्यता रद्द करू. शिक्षण अधिकाऱ्यांच्या या इशाऱ्यानंतर आणि मनविसेच्या आक्रमक भुमिके पुढे अखेर DPS शाळा प्रशासन नरमले असून, त्यांनी RTE २५% अंतर्गत ५० वंचित व दुर्बल घटकातील मुलांची यादी आज शाळेत जाहीर केली.
याबाबत कित्येक पालकांनी फोन करून आभार मानल्याचे मनसे विद्यार्थी सेनेचे सविनय म्हात्रे यांनी सांगितले. तसेच DPS च्या या निर्णयाचे स्वागत असून, नवी मुंबईत कोणत्याही पालकांना RTE अंतर्गत प्रवेश घेण्यास काही अडचण किंवा समस्या येत असल्यास तात्काळ मनसे विद्यार्थी सेनेला संपर्क करण्याचे आवाहन विद्यार्थी सेनेच्या संदेश डोंगरे (9664278717) आणि सनप्रीत तुर्मेकर (9664848007) यांनी केले आहे.