* दुर्गंधीने नाल्याशेजारील रहिवासी नागरिक त्रस्त
* पालिकेने उपाय योजना करण्याची मागणी
साईनाथ भोईर
़नवी मुंबई : बेलापूरमधील आर्टिस्ट व्हिलेजजवळील डोंगरापासून खाडीकडे पावसाळी पाणी वाहून नेणारा मोठा नाला पालिकेने बांधला आहे. परंतु या नाल्यात वर्षानुवर्षे सेक्टर 8 मधील झोपडपट्यांचे सांडपाणी वाहत असल्याने नाल्याच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे त्याच बरोबर हे पाणी साठून राहत असल्याने डासांचे प्रमाण देखील वाढले आहे. महापालिकेकडे गेल्या १० वर्षांपासून पाठपुरावा करून देखील पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे पालिकेने लवकर उपाय योजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

डोगरावरून येणारे पावसाळी पाणी रहिवासी भागात शिरू नये यासाठी पालिकेने आर्टिस्ट व्हिलेज पासून मोठा पावसाळी नाला खाडीपर्यंत बांधला आहे. आर्टिस्ट व्हिलेज जवळील सेक्टर 8 मधील झोपडपट्यांच्या मालवाहिन्या उंचावर असल्याने मल आणि सांडपाणी थेट या नाल्यात येत आहे. या नाल्यातून जाणारे पावसाळी पाणी सेक्टर 5 मधील मेट्रोलाईनच्या खालून सायन पनवेल महामार्गाच्या खालून खाडीत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु महामार्गाच्या शेजारी विषारी वायूची पाईप लाईन जाय असल्यामुळे या पाईप लाईनवर कांक्रीटचा मोठा थर टाकण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहणारे पाण्याला मोठा अडथळा निर्माण होत असून पाणी साठत आहे या नाल्यातून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचे सामराज्य पसरले असून डासांचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होत आहे. या नाल्यात मोठ्या सापांचे साम्राज्य देखील पसरले असून या ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या गायी पाण्यासाठी या नाल्यात उरल्यावर त्यांना साप चावल्याच्या घटना घडल्या आहेत तसेच साप नागरी वस्तीत देखील शिरत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी गेल्या 10 वर्षात पालिकेकडे हा नाला बंदिस्त करावा किंवा झोपडपट्टी भागातील मलवाहिन्यांचे काम करून या भागातून येणारे सांड पाणी कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी केली आहे, या ठिकाणाची परिस्थितीचा आढावा या पूर्वी महापौर, पालिका अधिकारी यांनी अनेकदा घेतला आहे, याबाबत ठराव मंजूर झाले आहेत परंतु काम झाले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत आहेत.
–पालिका सभागृहात गेल्या दहा वर्षात या समस्येबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतु काम झाल नाही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. हा नाला बंदिस्त करून यावर पार्किंगची सोय केल्यास सीबीडीतील पार्किंगचा प्रश्न देखील सुटेल किंवा नाल्यात पावसाळ्या व्यतिरिक्त येणारे पाणी कायमस्वरूपी बंद करावे. ==डॉ.जयाजी नाथ (स्थानिक नगरसेवक)