साईनाथ भोईर
़नवी मुंबई : नवी मुंबई शहर मोरबे धरणामुळे जलसंपन्न असले तरीही पाणी हे जीवन आहे हे लक्षात घेऊन तसेच राज्याच्या इतर भागातील पाण्याची कमतरता लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने पाण्याचा जबाबदारीने व काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक आहे. याकरीता,
़नवी मुंबई : नवी मुंबई शहर मोरबे धरणामुळे जलसंपन्न असले तरीही पाणी हे जीवन आहे हे लक्षात घेऊन तसेच राज्याच्या इतर भागातील पाण्याची कमतरता लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने पाण्याचा जबाबदारीने व काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक आहे. याकरीता,
* अंघोळ करताना धो-धो वाहणा-या शॉवरऐवजी पाण्याची बादली वापरून,
* दाढी करताना, दात घासताना नळ वाहता न सोडता त्याऐवजी पाण्याने भरलेला मग वापरून,
* कपडे धुण्यासाठी वाहत्या नळाचा वापर न करता पाण्याची बादली वापरून,
* टू व्हिलर – कार धुण्यासाठी पाण्याच्या वाहत्या पाईपऐवजी पाण्याची बादली व कपडा वापरून,
* शौचविधीनंतर फ्लशचा अनावश्यक वापर टाळून,
– अशा दैनंदिन अनेक छोट्या – छोट्या गोष्टींतून नागरिक पाण्याची मोठी बचत करू शकतात. पाण्याची बचत ही एकप्रकारे पाण्याची निर्मिती आहे हे लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यापासून फ्लशचा अनावश्यक वापर टाळण्यापर्यंत नागरिकांनी जागरूकतेने पाण्याचा वापर केला पाहिजे.
नागरिकांना पाणीपुरवठा विषयक तक्रारी / सूचना करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने विविध संपर्क सुविधा उपलब्ध करून दिल्या असून 1800222309 / 2310 या टोल फ्री क्रमांकांवर तसेच 8419900401 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर याशिवाय www.nmmc.gov.in या महापालिका संकेतस्थळावर आणि nmmc e- connect या मोबाईल ॲपवरील ‘तक्रार निवारण प्रणाली (Grievance Redressal System)’ मध्येही नागरिक आपल्या पाणीपुरवठा विषयक सूचना/ तक्रारी नोंदवू शकतात
नागरिकांनी दैनंदिन जीवनात जलबचतीचे महत्व लक्षात घेऊन नैसर्गिक जलप्रवाह, जलाशय, कालवे तसेच पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करून पाण्याविषयीचे कायदे व नियम यांचे काटेकोर पालन करायला हवे. पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असून त्यादृष्टीने पाण्याचा अपव्यय व गैरवापर मी स्वत: करणार नाही व करू देणार नाही अशी भूमिका प्रत्येक नागरिकाने मनापासून जपायला हवी.
म्हणूनच जलबचतीचे तंत्र जाणून सुजाण नवी मुंबई नागरिकांनी स्वत: जलबचत करावी व इतरांमध्येही जलबचतीची भावना रूजविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी केले आहे.