नवी मुंबई : संपूर्ण नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रात अनाधिकृत फेरीवाले हटविन्याचे काम प्रशासनाकड़ून युद्ध पातळी वर सुरु आहे.मात्र वाशी विभागात मोडणाऱ्या प्रभाग क्रमांक ५६कोपरी गाव येथील स्मशान भूमि समोरिल रस्त्यावर वसलेल्या अनाधिकृत मार्केट मधील फेरीवाल्यांकड़ून काही नागरिक यूनियन सदस्य होण्याच्या नावाखाली अर्ज भरून येथील फेरिवाल्यांची दिशाभूल करीत आहेत.
कोपरी गाव स्मशान भूमि समोर दररोज सायंकाळी मार्केट भरतो आणि याच गोष्टीचा फायदा घेत खोपडे नामक व्यक्ति आपल्या दोन ते तीन साथीदारांसह येथील फेरिवाल्यांकड़ून संघर्ष निधि च्या नावाने एक अर्ज भरून घेतात आणि त्या अर्जाचि किम्मत १००रुपये आकारतात.मात्र अर्ज भरल्यानंतर दिलेल्या पोच पावती मधे आकारलेल्या रूपयांचे शुल्क लिहिले जात नाही हे विशेष. आणि फेरिवाल्याना असे भासवतात की सदर अर्ज हे माननीय उच्च न्यायालयात लेबर यूनियन च्या माध्यमातून याचिका दाखल करावयाची आहे .तसेच नवी मुंबई महानगर पालिका परवाना विभागकड़ूंन एक सर्वेक्षण फेरिवाल्यासाठी केले जाईल आणि फेरिवाल्याना नवी मुंबई महानगर पालिकेकडुन अधिकृत परवाना प्राप्त होईल. आणि आपला व्यवसाय कायम स्वरूपी अधिकृत होईल असे येथील फेरिवाल्यांना या व्यक्ति कडून सांगण्यात येत.आपल्याला अधिकृत परवाना मिलेळ या भाबड्या आशेवर येथील फेरीवाल्यांनि अर्ज भरवुंन घेतले.विशेष म्हणजे अधिकृत परवाना मिळेल म्हणून काहिनी तर आपल्या घरातील इतर सदस्यानचाहि अर्ज भरून घेतला.अश्या प्रकारे येथील फेरिवाल्यांची उघड उघड फसवणूक होत आहे.जवळपास २००च्या घरात येथे फेरीवाले बसतात ,काहिनी अर्ज भरले तर काही अजुन बाकी आहेत.अश्या प्रकारे या व्यक्तिंकड़ून लोकांची दिशाभूल तर होतेच शिवाय परवाना भेटेल म्हणून दिवसांगनिक अधिक फेरीवाले येथे वाढत आहेत.अशी जर गोरगरीब फेरिवाल्यांची फसवणूक होत असेल आणि अनाधिकृत फेरिवाल्याना प्रोत्साहन मिळत असेल तर अश्या व्यक्तिंवर कायदेशर कारवाई प्रशासनाकड़ून होणार का? असा सवाल येथील नागरिक करत आहेत.
दरम्यान सदर प्रकारबाबत जेव्हा संभादित यूनियन च्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला असता समाधान कारक उत्तर नाही मिळाले.त्या मुळे होणाऱ्या वसूली बाबत शंका बळावत चालली आहे.अणि असिच जर फेरिवाल्यांची फसवणूक होत असेल आणि आपल्याला अधिकृत फेरीवाला परवाना भेटेल म्हणून फेरिवाल्याना प्रोत्सहान भेटत असेल तर या शाहराला बकालपण यायला किती उशीर लागेल.
——
जर कोणी महापालिका सर्वेक्षण करुण फेरीवाला परवाना वितरित करणार आहेत असे भासवुन फेरिवाल्यांकड़ूं कुठल्याही प्रकारचे शुल्क घेत असेल त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहणार नहीं .आनी असल्या प्रकाराबाबत नागरिकांनी नवी मुंबई महानगर पालिका परवाना विभागाशी संपर्क करुन योग्य ति शाहनिशा करुण घ्यावी. दरम्यान घडल्या प्रकारची योग्य ति चौकशी करुन त्या बाबतचा अहवाल वरिष्टाना कळवून त्या बाबत उचित कारवाई करण्याचे सूचित करण्यात येईल.
महेंद्र सिंग ठोके
वाशी विभाग अधिकारी