साईनाथ भोईर
नवी मुंबई-: नेरुळ येथील सेक्टर २० येथील गावात जाणाऱ्या रस्त्यावर पालिकेचे रस्ता खोदून केबल टाकण्याचे काम सुरु आहे.यात कहर म्हणजे पालिकेने येथील रस्ता तीन दिवसांपूर्वीच डांबर टाकून व्यवस्थित केला होता.तीनच दिवसांत हा रस्ता खोदून त्यात भूमिगत वायर्स टाकण्याचे काम चालू केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नेरुळ गाव सेक्टर २० रेल्वे स्थानकासमोर असलेला मार्ग तीन ते चार दिवसांपूर्वी पालिकेकडून डांबर टाकून व्यवस्थित करण्यात आलेला होता.कित्येक वर्षे खड्ड्यांमध्ये अडकलेला हा रस्ता दुरुस्ती केल्यामुळे नागरिक देखील खुश झाले होते.या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाला आतपर्यंत निवडणुका आल्यावरच मुहूर्त मिळत असल्याचा अनुभव आहे.त्यामुळे या रस्त्यावर ठीकठिकाणी खड्डे पडलेले होते.पालिकेच्या खड्डे विरहित दुरस्तीकरणामुळे आणि सपाटीकरणामुळे या रस्त्याला तेज आले होते.यावर नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले होते.मात्र तीन ते चार दिवसांतच येथील नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. तीन ते चार दिवसांतच लगेच पालिकेकडून या रस्त्याच्याकडेने खोदकाम झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे.त्यामुळे या नवीन सपाटीकरण केलेल्या रस्त्याची बाजू तर उखडली गेलीच परंतु रस्त्यावरदेखी धुळीचे आणि दगडांचे साम्राज्य पसरलेले आहे.हे काम पूर्ण झाल्यावर देखील येथील बाजू हि तशीच मातीने भरली गेली आहे.त्यामुळे कित्येक।ठिकाणी खोलगट तर काही ठिकाणी उंचवटा तयार झाला आहे.मात्र या मातीचा तर येथील दुकानदारांना होऊ लागला आहे.येथे छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्यांना या मातीतून वाऱ्यामुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास होऊ लागला आहे.मुळात पालिकेने या दोन्ही कामांना परवानगी देताना माहिती घ्यायला हवी होती.मात्र इथे पालिकेचे समोरण दुर्लक्ष झाले असल्याचे उघड झाले आहे.या घटनेमुळे पालिका नागरिकांच्या पैशांचा अपव्यय करत असल्याचे सिद्ध झाले आहे.यावर येथील नागरिक असंतोष व्यक्त करत आहेत.
———-
-पालिकेला खड्डा खणल्यानंतर डांबर टाकण्याचे काम करता येत नव्हते का? आम्ही कर रुपात पालिकेला आमच्या मेहनतीचे पैसे देत असतो.मात्र पालिका कसलाही विचार न करता पैशांचा अपव्यय करत असेल तर आम्ही कर का भरावा?असा सवाल देखील येथील नागरिकांनी बोलून दाखवला आहे.
(कलावती दिघे
नागरिक-नेरुळ सेक्टर-२०)