श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी शुक्रवारी, कस्तुरबा उद्यान, साईबाबा मंदिरा समोर, से-8 बी, सीबीडी तसेच एफ टाईप मार्केट, से-6, सीबीडी नवी मुंबई येथे आमदार आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत स्थानिक नागरिकांची भेट घेतली. नवी मुंबईतील घरे फ्री होल्ड सदंर्भात दोन दिवसांपूर्वी सिडको मध्ये बैठक झाली होती, त्या अनुषंगाने सीबीडी येथे नागरिकांशी सुसंवाद साधण्यात आला. सीबीडी येथील सिडकोनिर्मित घरे फ्री होल्ड करण्यासंदर्भात नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
गेली अनेक वर्षे सिडकोची घरे फ्री होल्ड करण्यासंदर्भात मी प्रयत्नशील होते, तसे मी माझ्या निवडणुकीच्या वचननाम्यात देखील उल्लेख केला होता. सदर काम हे 80% पूर्ण झाले असून सिडकोकडून त्यासंदर्भात मसुदा तयार करण्याचे काम प्राथमिक स्वरुपात सुरु झाले आहे. लवकरच येत्या दोन महिन्यात मसुदा तयार करून तो राज्य शासनाकडे शासन निर्णयाकरिता पाठविण्यात येईल व त्याचे परिपत्रक काढण्यात येईल, असे बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी उपस्थित रहीवाशांना सांगितले.
नागरिकांनीही यावेळी 2.5 % एफ.एस.आय. म्हणजे नक्की काय? यासंदर्भात आम्हाला मार्गदर्शन करण्यात यावे, असे सुचविले. नागरिकांनी सदर संदर्भात आपल्या ज्या काही सूचना असल्यास त्या लेखी स्वरुपात सांगितल्यास मी त्या सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व संबधित अधिकारी यांना सुचविण्यात येतील असेही आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
या कार्यक्रमावेळी सीबीडी- बेलापूर येथील अनेक नागरिकांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना लेखी स्वरूपात आपल्या समस्यांसदंर्भात निवेदन सादर केली. यावेळी नागरिकांनी आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले.
या प्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांजसमवेत गोपाळराव गायकवाड, निलेश म्हात्रे, दर्शन भारद्वाज, दामोदर पिल्ले, संतोष पळसकर, संजय ओबेरॉय, महेश जाधव, रवी ठाकूर, राजबल कुन्डूमल, मनोहर शेट, रमेश शेट्टी, धनसुख, बंडू मोरे, सचिन निळे तसेच सीबीडी-बेलापूर मधील अनेक जेष्ठ नागरिक, महिला व युवा वर्ग तसेच परिसरातील हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष/सचिव पदाधिकारी व असंख्य नागरिक उपस्थित होते.