साईनाथ भोईर / नवी मुंबई
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणार्या नवी मुंबई शहराची एकविसाव्या शतकातील शहर म्हणुन सार्या दुनियेला परिचित आहे. मात्र याच शहरात वाशीसारख्या अद्ययावत विभागात कोपरी गाव हा परिसर मोड़तो. मात्र आज या विभागाला विविध समस्यानी ग्रासले आहे. आज गावाला गावपण उरले नसून प्रत्येक ठिकाणी समस्या आ वासुन उभ्या आहेत.
** सांस्कृतिक भवनाची दुरावस्था**
गावात १९९८/९९ साली विकास निधीतून महानगर पालिकेने सांस्कृतिक भवन बांधले होते. परंतु आज या भवनाची परिस्थिति अत्यंत बिकट आहे भवनाच्या खिडक्या तूटलेल्या आहेत, दरवाजे तुटलेले आहेत, भिंतीचे प्लास्टर गळून भीतींना तडे गेले आहेत.
मुख्य म्हणजे या इमारतीत लहान मूलांकारिता अंगनवाडी भरवली जाते. जीव मुठित धरून पाल्य आपल्या मुलांना या अंगनवाड़ीत पाठवतात. या भवनाची आजची परिस्थिती पाहता या ही इमारत अत्यंत धोकादायक ठरत आहे. भविष्यात ही इमारत जर ढासळली तर लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय याच ईमारतीतून गावातील लहान बालकांकरिता पोलिओचे लसीकरण मोहिम राबविली जाते.
** मासळी मार्केटचा अभाव **
गावात २००० साली मासळी मार्केट बांधण्यात आले होते. परंतु सदर मार्केट स्मशान भूमीला लागून असल्याने आजतागत त्या मार्केट कुठल्याही प्रकारचे मासळीची विक्री झाली नाही. सर्व मासळी विक्रेत्यांनी रस्त्यावरच बसणे पसंत केले आहे. मार्केटची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, पत्रे तुटलेले आहेत. या बेवारस पडलेल्या मार्केटमध्ये बहुतांश वेळा जुगार ही खेळला जातो.
** कचरा कुंड्यांचा अभाव **
गावात कचरा कुंड्यांचा अभाव आहे. कचरा कुंड्या घरापासून गावाबाहेर असल्या कारणाने बहुतांश नागरिकांकडून रस्त्यावरच कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरुन रोगराईला आमंत्रण मिळते.
** सर्वात मुख्य समस्या म्हणजे ग्रेनेज सीवरेज ची बिकट अवस्था**
सांडपाणी वाहून नेणार्या मल:निस्सारण वाहिन्यांचे योग्य नियोजन नसल्याने मल:निस्सारण वाहिन्यांचे सांडपाणीे पाणी रस्त्यावर येते. दुर्गधींमुळेमुळे वाट काढणार्या नागरिकांना नाक मुठीत धरून रस्ता काढावा लागतो. दर दोन दिवसांनी या मल:निस्सारणच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा वनवास कधी संपेल आणि येथील नागरिक कधी मोकळा श्वास घेतील, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.