गणेश इंगवले
मुंबई : राज्यात शेतकर्यांच्या संपामुळे वातावरणात सर्वत्र तापलेले असताना या आंदोलनात आता मुंबई युवक काँग्रेेसही रस्त्यावर उतरली आहे. शेतकर्यांच्या मागण्यांकडे व समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी युवका काँग्रेसने आज घाटकोपर ‘रेल रोको’ आंदोलन केले.
शेतकर्यांच्या निर्णया विरोधात असलेल्या भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली असून आज गुरुवार ( दि 8 जून ) रोजी दुपारी 1: 30 च्या सुमारास युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरमध्ये ‘रेल रोको’ आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध केला . यावेळी कार्यकर्त्यानी डोक्यावर लाल पट्टी बांधून हातात झेंडे घेऊन रुळावर येऊन रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला संपूर्ण कर्ज माफी आणि शेतमालाला चांगला हमी भाव मिळावा यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी महाराष्ट्रासह अन्य राजायतही बळीअन्नदाता रस्त्यावर उतरला आहे . शेतकर्यांनी आपल्या आंदोलनाची तीव्रता सर्वत्र वाढविली आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकर्यांनी केलेल्या आंदोलनात तेथील मध्य सरकारने चालवलेल्या गोळीबारात 5 शेतकरी मृत्युमुखी पडले. अन्नदात्यावर केलेल्या गोळीबाराचा राजकीय पक्षांनी निषेध केला आहे . . युवक काँग्रेसने सोशल मीडियावर आधीच आंदोलन करणार असल्याचे सुचवले असल्यामुळे आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी दुपारी 12 वाजल्या पासून रेल्वे स्थानकावर हजेरी लावत कडक पहारा ठेवला होता . युवक काँग्रेसच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांनी दुपारी 1: 30 ची सीएसटीएम कडे जाणारी रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला . कार्यकर्त्यानी रुळावर येऊन भाजपा सरकारच्या मनमानी कारभाराचे फलक तसेच मोदी सरकारचा निषेध करत हाय हायच्या घोषणा दिल्या. अर्धा तास रेल्वे थांबवून कार्यकर्त्यांनी स्थानकावर मोदी सरकार विरुद्ध घोषणा बाजी केली . यावेळी रेल्वे पोलिसांनी युथ काँग्रेसचे मुंबई प्रवक्ते सुधांशु भट , अब्राहमन राय , अभिषेक सावंत , रितिक जोशी या पदाधिकार्यांसह 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे .
युथ काँग्रेसचे मुंबई प्रवक्ते सुधांशु भट यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, भाजपा सरकार हे शेतकर्यांच्या विरोधात आहे . अच्छे दिन म्हणणार्या मोदी सरकारने मध्य प्रदेशात शेतकर्यांवर गोळीबार करून शेतकर्त्यांविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे . कर्ज मुक्तीसाठी आणि शेतमालाला हमी भाव मिळण्यासाठी आंदोलनात उतरलेल्या शेतकर्याला हे सरकार न्याय देऊच शकत नाही . मोदी सरकारला धारेवर धरण्यासाठी युथ काँग्रेस मुंबईभर हे आंदोलन छेडत राहणार आहे . जो पर्यंत सरकार शेतकर्यांना योग्य न्याय देत नाही तोवर युवक काँग्रेसच्या वतीने चालूच राहणार असल्याचे प्रवक्ते सुधांशु भट यांनी सांगितले .