गणेश इंगवले
नवी मुंबई : कर्नाटकातील बेळगाव येथे सलग ५१ तास स्केटिंग करुन गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली विक्रमी नोंद करणार्या नवी मुंबईतील ११ खेळाडूंचा लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते शनिवारी सत्कार करण्यात आला.
बेळगावातील शिवगंगा स्केटिंग रिंगवर देशभरातील ४२५ खेळाडूंनी १ जुन ते ३ जुन या कालावधीत एकत्र येत सलग ५१ तास स्केटिंगचा विश्वविक्रम केला आहे. त्यामध्ये निहार पाटील, दुर्वेश पांगळे, सी.एल.नारायणन, राशी कातरमल, तिर्थ शाह, आदित्य जाधव, सुकुन शेख, धिरेन गांधी, देवांशू चौधरी, अर्नव कासले आणि राजवर्धन सोनावणे या नवी मुंबईतील खेळाडूंनी या विक्रमात आपला सहभाग नोंदवला. संजय सिंग आण्ि प्रदीपकुमार सिंग या दोघांनी या स्केटिंगपटूंना यासाठी प्रशिक्षण दिले. खेळाडूंसह या प्रशिक्षकांचा देखील लोकनेते नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या खेळाडूंच्या आणि प्रशिक्षकांच्या कामगिरीचे अभिनंदन करुन भविष्यातही अशाच प्रकारे दैदिप्यमान कामगिरी सातत्याने करण्यासाठी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंच्या सदैव पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. तसेच नवी मुंबईत या खेळाडूंनी मागणी केल्याप्रमाणे अद्ययावत स्केटिंग ट्रॅक उभारण्याचे आश्वासन दिले. या सत्कार समारंभास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, माजी महापौर सागर नाईक, ‘फाम’चे अध्यक्ष मोहन गुरनानी, नवी मुंबई महापालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती लिलाधर नाईक, नगरसेवक शशिकांत राउत, नगरसेवक प्रकाश मोरे, नगरसेविका वैशालीताई नाईक, नगरसेविका उषाताई भोईर, नगरसेविका प्रज्ञा भोईर, माजी नगरसेवक रामआशिष यादव, माजी नगरसेवक प्रभाकर भोईर, समाजसेवक पुरुषोत्तम भोईर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष राजेश मढवी, शिल्पा केनिया, जशीला जयप्रकाश, शिवानी भांबिया यांच्यासह खेळाडूंचे पालक मोठया संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.