गणेश इंगवले
नवी मुंबई : नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ,जेएनपीटी,सेझ याठिकाणी स्थानिकांना प्राधान्याने रोजगार मिळावा हि आमची भूमिका आहे. माथाडी कामगारांच्या नोंदणीकृत टोळ्यांना प्राधान्याने काम मिळावे यासाठीसुद्धा आम्ही आग्रही आहोत. टाटा स्टील बाबत राज्य शासनाला हस्तक्षेप करायला लावून कळंबोली मधील माथाडी कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश त्यांच्यासाठी भाग्याचा दिवस ठरेल असे काम करू असे ठोस आश्वासन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले. कळंबोली लोखंड बाजार मधील माथाडी कामगारांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपची ताकद पाठीशी असल्यामुळे मी जे बोलतो ते करून दाखवतो असेही ते यावेळी म्हणाले.
कळंबोली लोखंड बाजार मध्ये शेकडो माथाडी कामगारांच्या जुन्या टोळ्यांना डावलून नव्या टोळ्यांना कामे मिळत असल्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. टाटा स्टीलप्रमाने कंपन्यांचे काम बंद पडल्यामुळे कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली होती. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेकडो कामगारांनी रविवारी (दिनांक १८ जून) भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,भारतीय जनता माथाडी कामगार जनरल महासंघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील,कार्याध्यक्ष संतोष पाटील,अभिजित खंडागळे,दिनेशभाऊ मीठभाऊकर,श्री पाचपुते,नगरसेवक अमर पाटील,भाजप नेते रामदास शेवाळे,अशोक मोटे,संभाजी भोसले,प्रकाश महानवर,समाजसेवक सतीश धायगुडे,विक्रम बेरगळ,सतीश बिचकुले यांच्यासह हजारो कामगार उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले कि, कामगारांच्या तीन तीन पिढ्या कळंबोलीत राहत आहेत. त्यांच्या कंपन्यांवर आलेल्या संकटांना वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने न्याय दिला नाही. त्या सरकारच्या आश्वासनपूर्ततेला मर्यादा होत्या म्हणूनच आम्हीसुद्धा भाजपमध्ये आलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेळप्रसंगी पक्षाचे लुकसान सहन करून सर्वसामान्यांसाठी काम करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक कामगाराला रोजगार मिळेपर्यंत आता शांत बसायचे नाही. एकीकडे खूप काम तर दुसरीकडे बेरोजगारी हि विषमता दूर करण्यासाठी काम करायचे आहे. भाजपची ताकद पाठीशी असल्यामुळे मी जे बोलतो ते करून दाखवतो असेही ते यावेळी म्हणाले. कामगारांचा भाजप प्रवेश हा योग्य निर्णय आहे हे सिद्ध करून दाखवण्याची जबाबदारी आमची आहे. टाटा स्टील बाबत राज्य शासनाला हस्तक्षेप करायला लावून कळंबोली मधील माथाडी कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश त्यांच्यासाठी भाग्याचा दिवस ठरेल असे काम करू असे ठोस आश्वासनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी कामगारांना दिले.शेवटी एकमुठ होऊन काम करूया असे आवाहनही त्यांनी केले.
भाजप नेते रामदास शेवाळे यांनी यावेळी तथाकथित विरोधी कामगार संघटनांवर ताशेरे ओढले. येत्या काळात येथील कंपन्या का बंद पडल्या,कोणी बंद पाडल्या याचा व्हिडीओ दाखवणार असल्याचे सांगितले. कामगारांची दिशाभूल करून स्वार्थ साधणाऱ्या तथाकथित नेत्यांना सोडून उशिरा का होईना कामगारांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्याबद्धल शेवाळे यांनी कामगारांचे अभिनंदन केले.
अशोक मोटे यांनी आपल्या मनोगतामध्ये हिंदुस्थान को ऑप बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीची चौकशी करा अशी मागणी केली.
कामगारांनीही आपल्या मनोगतामध्ये व्यथा मांडल्या.भाजपकडून खूप अपेक्षा असल्याच्या भावना कामगारांनी व्यक्त केल्या.यावेळी मारुती बोडके,राजू कानडे,शरद माने,किसन यादव,चंद्रकांत सस्ते,लक्ष्मण कदम,संतोष कुंभार,रघुनाथ राऊत,नाना ढेंबरे,अनिल ढेंबरे,रमेश शिर्के,ज्ञानेश्वर घाडगे,राजू जाधव,सचिन ढेबरे,मारुती सूळ यांच्यासह शेकडो माथाडी कामगारांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केले. एकूणच या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे.
चौकट
सर्वसामान्य कामगारांविषयी तळमळ असलेला भाजप पक्ष सत्तेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळाची ४०० कोटींची तरतूद केली आहे. सर्वाना काम आणि हक्काचे घर हे भाजपचे धोरण आहे. स्थानिक कामगारांसाठी वाट्टेल ती किम्मत मोजणारे आमदार प्रशांत ठाकूर सोबत आहेत. त्यामुळे कामगारांच्या विश्वासाला भाजपमध्ये तडा जाणार नाही.
— शिवाजीराव पाटील
भारतीय जनता माथाडी कामगार जनरल महासंघाचे अध्यक्ष