साईनाथ भोईर / नवी मुंबई
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण दादर येथील प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन येथील कार्यालयातील नियोजित बैठकीला तब्बल सव्वा तास उशिराने उपस्थिती लावली. प्रदेशाध्यक्षांच्या या लेटलतिफपणाबद्दल उपस्थित काँग्रेसच्या पदाधिकार्यांकडून नाराजीचा सूर आळविला जात आहे.
महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीच्या अंर्तगत असणार्या नियोजन विभागाची तातडीने पुनर्रचना करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे या समितीचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.
या समितीची बैठक 22 जून रोजी दादर टिळक भवन येथे दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या बैठकीकरिता उपस्थित राहणार असल्याने काँग्रेसचे घटक लवकरच हजर झाले होते. परंतु ज्या विभागाची बैठक होती, त्या विभागाचे अध्यक्ष अशोक चव्हाणच दुपारी 4.15 वाजता प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात हजर झाले. अशोक चव्हाणांच्या समोर कोणी काही बोलले नसले तरी ते गेल्यावर मात्र त्यांच्या लेटलतिफ उपस्थितीविषयी खासगीत बोलताना काँग्रेसच्या मंडळींनी तोंडसुख घेतले. एकतर पक्षाची सत्ता गेली, जनाधार कमी होतोय आणि प्रदेशाध्यक्षच बैठकीला लेट येत आहे असा उपरोधिक टोमणा एका पदाधिकार्यांने सर्वासमोर मारला.