गणेश इंगवले / नवी मुंबई
कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव तत्पर राहू, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पागोटे येथे केले. .
पंजाब कॉन्वेर मधील गॅड लॉजिस्टीकच्या तसेच धुतूम येथील आय.ओ.टी.एल. कामगारांनी भाजपप्रणीत जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्विकारले असून येथील नामफलकाचे अनावरण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, उरणचे उपनगराध्यक्ष रवी भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी सरपंच जितेंद्र घरत, युवा नेते समीर मढवी, भाजपचे उरण शहराध्यक्ष कौशिक शहा, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, कामगार नेते सुरेश पाटील, रविंद्र नाईक,जयविन्द कोळी,प्रकाश ठाकूर, शेखर तांडेल, तेजस पाटील, मोतीलाल कोळी, मेघनाथ म्हात्रे, संतोष मढवी, अरुण ठाकूर, जितेंद्र पाटील, कामगार प्रतिनिधी निलेश पाटील, जनार्दन पाटील, जयप्रकाश घरत, धीरज कोळी, राजू घरत, विलास म्हात्रे, सोमनाथ भगत, शशिकांत ठाकूर, चंद्रकांत कडू, किशोर पाटील, विजय ठाकूर, राम घरत, धर्मा ठाकूर, गजानन ठाकूर, कृष्णा पाटील, सदाशिव ठाकूर, हरिचंद्र घरत, विश्वास पाटील, शेखर पाटील, धीरज महाले, किरण काजारे यांच्यासह कामगार उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देणार असल्याचे सांगतानाच कामगारांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे आश्वासित केले. कामगार जगला तर उद्योगधंदे. कारखाने जगतील, त्यामुळे कारखानदारांनी कामगारांसोबत कायम समन्वय साधत प्रगती करावी, असेही ते म्हणाले. या ठिकाणी भाजपप्रणीत कामगार संघटना स्थापन झाली असून ती तोडण्याचा विरॊधकांनी प्रयत्न करू नये, अन्यथा जशाच तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी महेश बालदी यांनी, कामगारांच्या हितासाठी सर्वोतरी प्रयत्न करणार असल्याचे नमूद करून वेळ पडल्यास राज्य व केंद्र सरकारची मदत घेऊ, असे आश्वासन कामगारांना दिले.
या सोहळ्याचे प्रास्ताविक जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी केले.