गणेश इंगवले / नवी मुंबई
स्वच्छ भारत मिशन अतंर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये कच-याचे वर्गीकरण हे कचरा निर्माम होणा-या ठिकाणीच करून ओला कचरा हिरव्या कुंडीत व सुका कचरा निळ्या कचरा कुंडीत टाकणे नागरिकांना बंधनकारक करण्यात आले असून मोठ्याप्रमाणावर कचरा (100 कि.ग्रॅ. पेक्षा जास्त कचरा) निर्मिती करणा-या संस्थांना त्यांच्या संस्थेच्या परिसरातच कच-यावर सेंद्रिय अथवा जैविक पध्दतीने प्रक्रिया करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने दिनांक 16/06/2017 ते 30/06/2017 या पंधरवडा कालावधीत स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार, परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व विभाग अधिकारी श्री. महेंद्रसिंग ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
सदर मोहिमेच्या अनुषंगाने दिनांक 29/06/2017 रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी विभाग कार्यक्षेत्रातील स्व.शंकरराव विश्वासराव विद्यालय, शाळा क्र.28, याशाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या घरात त्याचप्रमाणे शाळेमध्ये होणा-या कच-याचे वर्गीकरण हे कचरा निर्माण होणा-या ठिकाणीच करून ओला कचरा हिरव्या कचरा कुंडीत व सुका कचरा निळ्या कचरा कुंडीत टाकणे बाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयाच्या आवारातच कच-यावर सेंद्रिय पध्दतीने प्रक्रिया करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या श्रमदानातुन विद्यालयाच्या आवारातच कंपोस्टींग पीट तयार केले. सदर कार्यक्रमावेळी वाशई विभागातील स्वच्छता अधिकारी श्री. विनायक जुईकर, शाळेचे मुख्याध्यापक, स्वच्छता निरीक्षक श्रीम. जयश्री आढाल, श्री. संतोष देवरस, श्री. महेद्र महाडीक, श्री. भुषण सुतार, श्री. मोनिश म्हात्रे, श्री. ज्योती मोरे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, स्वच्छाग्रही व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.