सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : पोर्ट सिंगापूर अथोरिटी( पीएसए)इंटरनॅशनल कंपनीचा एक भाग असलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रा. लि. (बीएमसीटी) साठीच्या तीन सुपरपोस्ट पॅनामॅक्स क्वाय क्रेन 30 जून 2017 रोजी दाखल झाल्याने बीएमसीटीला आपल्या नियोजित कामाला 2017 सालच्या अखेरीस प्रारंभ करता येणार आहे.
बीएमसीटीच्या या पहिल्या क्रेन्सचे वैशिष्ट्य म्हणजे त्या 65 टन इतक्या वजनाचे कंटेनर उचलू शकत असून ट्वीनलिफ्ट आहेत. तसेच त्यांचा आवाका63 मीटर अंतरापर्यंतचा आहे. त्यामुळे 22 कंटेनर सामावणाऱ्या मोठ्या वाहनांवरील कंटेनर आता या क्रेन उचलू शकतात. या क्रेनचे उत्पादन व्हिएतनामच्या दुसाँ हेवी इंडस्ट्रीजने केले आहे. आता या क्रेनच्या डिलिव्हरीचा दुसरा टप्पा म्हणजे आणखी तीन महाकाय क्रेन 2017 च्या सप्टेंबरमध्ये येणार असून 2018 आणि 2019 मध्ये आणखी सहा क्रेन दाखल होणार आहेत.
याच वर्षी म्हणजे 2017 साली बीएमसीटीच्या ताफ्यात रबर टायरच्या आणखी 18 गॅन्ट्री क्रेन (आरटीजी) दाखल होणार असून त्याद्वारे कंपनीला यार्डातील कामात सहजता आणता येणार आहे. तर येत्या सप्टेंबरात 4 रेल्वेवर उभारलेल्या गॅन्ट्री क्रेन (आरएमजी) येत आहेत. या क्रेनमुळे 1.5 कि.मी. अंतराच्या डबल स्टॅक डेडिकेटेड फ्राईट कॉरिडोर (डीएफसी) रेल्वेगाड्यां
बीएमसीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश अमिरापु यांनी या संदर्भात सांगितले की, आमच्या काम सुरु करण्याच्या नियोजित तारखेच्या सुमारे पाच महिने आधीच पहिल्या तुकडीच्या 3 क्वाय क्रेन आमच्या ताफ्यात दाखल झाल्याने आमची वेळेवर काम सुरु करण्याबाबतची हमी अधोरेखित झाली आहे. भारतातील बंदरे आणि अवजड सामान चढउतार करण्याच्या व्यवसायावर बीएमसीटी आपली वेगळी छाप उमटवणार असून विविध सुविधा आणि डेडिकेटेड फ्राईट कॉरिडोरच्या रेल्वे गाड्यांवरील कंटेनर हाताळण्याच्या क्षमतेमुळे बीएमसीटी या क्षेत्रातील आगळी कंपनी ठरेल.
अमिरापु यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, कंपनीने कर्मचारी भरतीची प्रक्रियाही सुरु केली आहे. पहिल्या 100 शिकाऊ इक्विपमेन्ट ऑपरेटर आणि टेक्निशियन पदांसाठी आम्ही ऑनलाईन चाचणी आयोजित केली होती. या चाचणीत 662 उमेदवारांचा समावेश होता. हे सर्व उमेदवार जेएनपीटी प्रकल्पबाधित अर्जदार आहेत. आता भरती प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यात आम्ही या सर्व जेएनपीटी प्रकल्पबाधित उमेदवारांच्या कागदपत्रांबाबतची माहिती जेएनपीटीकडून पडताळून घेत आहोत. त्यानंतर अंतिम मुलाखती होतील. आमच्या कर्मचाऱ्यांची पहिली तुकडी ही बंदराशी संबंधित कर्मचाऱ्यांची असल्याने आम्हाला विशेष आनंद आहे. जेएनपीटी प्रकल्पबाधितांपैकी जे कर्मचारी आमच्या गरजांनुरुप असतील त्यांना भरतीत प्राधान्य दिले जाईल, असेही अमिरापु यांनी अखेरीस स्पष्ट केले.