राजकोट दि 30 – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार अमान्य असल्याचा ईशारा देणाऱ्या जाहीर केलेल्या भूमिकेचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे . ज्या राज्यांत गोरक्षणाच्या नावावर हिंसाचार करण्यात येईल ; माणसं मारणाचे प्रकार होतील तेथील राज्य सरकारांनी अश्या रक्षक नव्हे भक्षकांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी ना . रामदास आठवले यांनी केली आहे .
राजकोट जिल्ह्यातील दाभोई तालुक्यातील पलसवाडा गावात अपंग बालकांसाठी जय दिव्यांग शाळेचे उद्घाटन केंद्रिय सामाजीक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते झाले .त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ना. आठवले बोलत होते .
यावेळी स्वामी शंकराचार्य आणि रिपाइं (ए) चे गुजरात राज्य अध्यक्ष अशोक भट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
देशाचा विकास शांतता बंधुता आणि अहिंसेच्या मार्गानेच होणार आहे . कुणीही कायदा हातात घेऊ नये . गोरक्षणाच्या नावाने होत असलेला हिंसाचार; गुंडगिरी करून गायीला बदनाम करणारे हे रक्षक आहेत की भक्षक आहेत ?
गोरक्षणाच्या नावाखाली अत्याचार खपवून घेणार नसल्याचा इशारा ना.रामदास आठवले यांनी यावेळी दिला .
दिव्यांगांना मदत करा. केवळ आत्ममग्न राहून स्वार्थी आनंदात राहण्यापेक्षा दुसऱ्याचे दुःख हलके करण्यासाठी पुढे आले पाहिजे . दिव्यांगाना मदत करून त्यांच्या जीवनात आनंद फुलवा .दुसऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविणारेच खरे सुखी आणि आनंदी राहू शकतात असे सांगत सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयातर्फे दिव्यांगाना मदत करण्यासाठी
त्यांना साक्षम करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे ना. रामदास आठवले बोलत होते .