मुंबई दि 30 – पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक विचारवंत प्रा डॉ गंगाधर यांचे मराठी साहित्यात अपूर्व योगदान दिले असून त्या बद्दल त्यांचा भारत सरकारच्या वतीने पद्मश्री किताबाने गौरव व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना पद्मश्री मिळवून दवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी मनमाड येथे दिले .मनमाड येथे सगळे लॉन येथे ज्येष्ठ साहित्यिक डॉ गंगाधर पानतावणे यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त मनमाड नागरपरिषदेतर्फे जाहीर सत्कार आयोजित कारण्यात आला होता .यावेळी ना . रामदास आठवले आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते भव्य पुष्पहार ;मानपत्र सन्मानचिन्ह आणि महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी मनमाड नगर परिषदेच्या अध्यक्षा पद्मावती उपनगराध्यक्ष राजू अहिरे
सुहास कांदे आणि रिपाइं चे काकासाहेब खांबाळकर श्रीकांत भालेराव रमेश मकासरे जील्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे हेमंत रणपिसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते .
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना . रामदास आठवले म्हणाले की मी खुसखुशीत भाषणांसाठी शिघ्र कविता सादर करतो . पण मी नाही कवी मला क्रांती हवी असे सांगत मी पुस्तकातला कवी नाही. मला पुस्तकं वाचायला वेळ नाही मात्र मी माणसं वाचणारा त्यांच्या भावना ओळखणारा त्यांचे अर्ज वाचण्यात व्यग्र आहे . मी वैचारिक साहित्यिक नाही मात्र कोणतीही चळवळ चालविताना त्यास वैचारिक मार्गदर्शन हवे असते त्यासाठी आपण परिवर्तन साहित्य महामंडळ स्थापन केले .डॉ गंगाधर पानतावणे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील सर्वसमावेशक रिपब्लिकन पक्ष हवा आहे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे ते सुद्धा माझ्या रिपाइं ( ए) चे सदस्य असल्याचे गुपित ना रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले .
अस्मितादर्श चालविणारे प्रा .डॉ . गंगाधर पानतावणे निस्पृहपणे साहित्यसेवा करीत आलेत .समाजप्रबोधन करीत आलेत . त्यांच्या सारखी सात्विक माणसे हि समाजाला योग्य दिशा दाखविणारे दीपस्तंभ आहेत अश्या शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी डॉ पानतावणे यांचा गौरव केला .
यावेळी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनता आणि मनमाड मधील साहत्यप्रेमीजन उपस्थित होते .