सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्
शिर्डी येथील सिध्द संकल्प मॅरेज हॉल येथे आज पार पडलेल्या श्री साई सेवक संमेलनात डॉ.हावरे बोलत होते. या प्रसंगी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, प्रताप भोसले, विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिताताई शेळके,कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते. देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पदयात्री साई पालख्यांच्या प्रतिनिधींच्या या श्री साई सेवक संमेलनास ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी डॉ.हावरे म्हणाले, शेवगांवच्या शिवशंकर भाऊ पाटील यांचे आशिर्वाद घेवून शेगांवच्या सेवेकरी योजनेच्या धर्तीवर साईसेवक योजना राबविण्यात येणार असून श्री साईबाबांच्या मंदिरात सेवाभाव वाढवणे व भक्तांना सेवाभावी वागणूक मिळण्यासाठी ही योजना सुरु करण्यात येत आहे. पालखी सोबत येणा-या पदयात्री भाविकांना साईसेवक हा सन्मान देण्याचा आणि साईंची सेवा करण्याची संधी या माध्यमातून दिली जाणार आहे. या साई सेवकांचा 21 व्यक्तींचा 01 गट तयार करण्यात आला असून रविवार ते शनिवार 01 गट काम करेल असे एका आठवडयात 6 ते 2 व 2 ते 10 यावे
या प्रसंगी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, प्रताप भोसले व विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिताताई शेळके यांची भाषणे झाली. तसेच साई पालख्यांच्या प्रतिनिधींनी आपली मते व्यक्त केली. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात 5 साई सेवकांना साई सेवक नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केले तर आभार उपकार्यकारी अधिकारी डॉ.संदीप आहेर यांनी मानले.