सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. 3 जुलै) नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट घेवून अनिवासी/व्यावसायिक मालमत्ता कर न भरणार्या खाजगी रुग्णलयांची नोंदणी रद्द करण्याचि मागणी केली.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आरोग्य विभागामार्फत दि बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन (सुधारित) अक्ट 2005 च्या कलम 5 नूसारखाजगी रूग्णालयांची नोंदणी करण्यात येते. दि बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अक्ट 2005 नूसार रुग्णालयनोंदणी करताना विहीत अर्जा सोबत रुग्णालय इमारती संबंधित अनिवासी/ व्यावसायिक मालमत्ता कर भरणा केल्याची पावती सादर करणे बंधनकारक असताना नवी मुंबईतील काही बड्या रुग्णालयांनी निवासी मालमत्ता कर भरल्याची पावती सादर करून रुग्णालय परवानगी घेतल्याची धक्कादायक बाब मनसेने निदर्शनास आणली आहे .यावेळी रुग्णांकडून लाखोंची भरमसाठ बिले उकळ्णार्या नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल,तेरणा हॉस्पिटल,डॉ डि वाय पाटील हॉस्पिटल, पि के सी हॉस्पिटल,एम जी एम हॉस्पिटल या बड्या रुग्णालयांची निवासी मालमत्ता कराची देयकांची प्रती आयुक्तांसमोर सादर केल्या.विशेष म्हणजे अपोलो हॉस्पिटल या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देखिल निवासी मालमत्ता कर आकारून विशेष सवलत देण्यात आलि आहे . निवासी मालमत्ता कर भरणा केल्याची पावती सादर करून रुग्णालय नोंदणी करून पालिकेची फसवणूक करणार्या खाजगी रूग्णालयांची नोंदणी रद्द करून सदर संस्थावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी यावेळी आयुक्ताकडे केली.
विशेष म्हणजे रुग्णालय नोंदणी अर्ज प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय आरोग्य अधिकार्याने सर्व कागदपत्रे तपासून रुग्णालय परवानगी देणे क्रमप्राप्त असताना निवासी मालमत्ता कर भरणार्या खाजगी रूग्णालयांना परवानगी बक्षीस म्हणून देणार्या वैधकीय आरोग्य अधिकारी तसेच रूग्णांना भरमसाठ बिले आकारणार्या बड्या रूग्णालयांना निवासी मालमत्ता कर आकारून पालिकेचा महसूल बुडविणार्या मुख्य मालमत्ता कर निर्धारक अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सविनय म्हात्रे यांनी केली.
तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाने या रुग्णालयास परवानगी देताना कोणतीच कागदपत्रे तपासली नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला . त्यामुळे या रुग्णालयांना डोळेझाकपणे परवानगी देणार्या वैधकिय आरोग्य अधिकार्यांची चौकशी करून निलंबन करण्यात यावे अशी मागणी सविनय म्हात्रे यांनी केली. याप्रसंगी शिष्टमंडळात मनसेचे शहर सचिव संदीप गलूगडे , मनविसेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे, सनप्रित तुर्मेकर, अमित दूरकर आदी उपस्थित होते.