पनवेल : पनवेल महानगरपालिका,एमजेपी,सिड
पनवेल रेल्वे स्थानकासंदर्भात केंद्र सरकारने घोषित केलेल्या ५ प्रकल्पांमध्ये साधारण २०० करोड रुपयांची तरतूद रेल्वे मंत्रालयाकडे सरकारने केली आहे. पनवेल रेल्वे स्थानक हे महत्वपूर्ण स्थानक म्हणून उदयास येत असताना येथे प्रवाशांना सेवासुविधांचा अभाव जाणवत आहे. राईट टू पी म्हणजे शौचालय व्यवस्था हि सुद्धा गरजेची बाब आहे. मुंबईवरून दिढ ते दोन तासांचा प्रवास करून आल्यानंतर प्रवाशांना शौचालय असणे गरजेचे असते. डायबिटीजच्या रुग्णांना ठराविक कालावधीनंतर मूत्र विसर्जनाची आवश्यकता असते. त्यामुळे अशा लोकांची सध्या पनवेल रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृह बंद असल्यामुळे परवड होत आहे.
सद्यस्थितीला येथील प्रसाधनगृह अस्वच्छ आणि बेवारशी अवस्थेत उभे आहे. स्वच्छतागृह सुरु व्हावे यासाठी अनेक प्रवाशी आणि सामाजिक संस्था स्टेशन व्यवस्थापकांकडे तक्रार करीत आहेत.
चौकट
पूर्वीच्या स्वच्छतागृह ठेकेदाराला १ लाख १० हजार भाडे द्यावे लागत होते. त्याशिवाय त्याला मासिक ४५ हजार पाणीपट्टी द्यावी लागणार होती. त्यामुळे सदर ठेकेदाराने स्वच्छतागृह बंद केले असून आमचे प्रयत्न सुरु आहेत. प्लॅटफॉर्म ५ वर एक स्वच्छतागृह उपलब्ध असले तरी मुख्य स्वच्छतागृह बंद असल्यामुळे प्रवाशांना थोडा त्रास सहन करावा लागत आहे.
— डि. के. गुप्ता
स्थानक व्यवस्थापक