सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : नवी मुंबईतील वीज समस्यांबाबत फक्त मिटींगला हजेरी लावू नका, जी कामे गेल्या अनेक वर्षापासून रंगाळली आहेत. ती आठ दिवसात मार्गी लावा. बिले विलंबाने नाही तर वेळेवर दया. अशी तंबी खासदार राजन विचारे यांनी आज येथे वीज मंडळाच्या अधिकार्यांना देऊन वीज मंडळाच्या गलथान कारभाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
वीज ग्राहकांच्या समस्या आणि अडचणी मार्गी लावण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी बुधवारी बेलापूर येथील सिडको गेस्ट हाऊसमध्ये वीज मंडळाच्या अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीला महापालिकेचे नगरसेवक आणि नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी विज मंडळाच्या गलथान कारभाराचे नागरीकांनी व नगरसेवकांनी वस्ञहरण केले. तुर्भे स्टोअर्स परीसरात वीजेची चोरी मोठ्या प्रमाणात होत असून चोरीला जात असलेल्या विजेचा भर वीज मंडळ अधिकृत ग्राहकांच्या माथ्यावर मारीत आहे. त्यांना आव्वाच्या सव्वा रक्कमेची बिले पाठवली जात आहेत. नवी मुंबई शहर हे 21 व्या युगातील आधुनिक शहर म्हणून ओळखले जात असले, तरी घणसोली परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. शहरातील अनेक सबस्टेशन चरशी आणि दारूडयांचे अड्डे बनले आहेत. सबस्टेशनच्या आवाराला साधे कंपाऊन्डही वीज मंडळाला घालता आले नाही.तसेच ठेकेदारांना संगमत करून न केलेल्या कामाची बिले काढून दिले जातात आसा पंचनामा वीज ग्राहकांनी यावेळी केला. त्यानंतर उपस्थितांच्या शंकाचे निरसर करताना वीज मंडळाच्या अधिकारयांच्या नाकीनऊ आले.ही कामे तातडीने मार्गी लावा. वाढीव बिलांबाबत प्रत्येक प्रभागात जाऊन बैठक घ्या, आणि तिथे ती बिले कमी करून देण्याची व्यवस्था करा. अशा सुचनाही खासदारांनी वीज मंडळाच्या अधिकार्यांना केल्या.
या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख अॅड. मनोहर गायके, शहरप्रमुख विजय माने, सिडकोचे माजी संचालक व नगरसेवक नामदेव भगत, किशोर पाटकर , एम.के. मढवी, रंगनाथ औटी, मनोज हळदणकर, ज्ञानेश्वर सुतार, विशाल ससाणे, सोमनाथ वास्कर, उपशहर प्रमुख प्रकाश पाटील, परिवहन समिती सदस्य समीर बागवान आदी उपस्थित राहून आपल्या प्रभागातील समस्या खासदार राजन विचारे व वीज मंडळाचे अधीक्षक अभियंता मानकर व इतर कार्यकारी अभियंता यांच्या निर्दशनास आणून दिल्या.