सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : शहरातील वीजविषयक समस्यांचा सविस्तर सचित्र अहवाल देवून त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही महावितरण कंपनीकडून अपेक्षित कार्यवाही होत नाही. त्यामुळे येत्या तीन दिवसात जर दिघा, ऐरोली, घणसोली, तळवली, गोठीवली, दत्तनगर,कोपरखैरणे, तुर्भे, वाशी इत्यादी भागातील वीजेच्या लंपडावासहीत इतर गंभीर समस्या दूर केल्या नाहीत तर जनतेसह लोकशाही मार्गाने महावितरण कंपनीविरोधात आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा आमदार संदीप नाईक यांनी दिला आहे.
नवी मुंबई : शहरातील वीजविषयक समस्यांचा सविस्तर सचित्र अहवाल देवून त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही महावितरण कंपनीकडून अपेक्षित कार्यवाही होत नाही. त्यामुळे येत्या तीन दिवसात जर दिघा, ऐरोली, घणसोली, तळवली, गोठीवली, दत्तनगर,कोपरखैरणे, तुर्भे, वाशी इत्यादी भागातील वीजेच्या लंपडावासहीत इतर गंभीर समस्या दूर केल्या नाहीत तर जनतेसह लोकशाही मार्गाने महावितरण कंपनीविरोधात आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा आमदार संदीप नाईक यांनी दिला आहे.
घणसोली, तळवली,गोठीवली, दत्तनगर या भागात रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत रोज वीजपुरवठा खंडीत होतो. त्यामुळे येथील रहिवासी कमालीचे त्रासले आहेत. या भागासह इतर विभागांतील वीज समस्यांची गंभीर दखल घेत आमदार संदीप नाईक यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसह महावितरणच्या ऐरोली कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी-अभियंता मोहन देशपांडे यांची गुरुवारी भेट घेतली. चुकीचे मिटर रिडिंग घेणे, अव्वाच्या सव्वा बिले येण्याचे प्रमाण वाढले आहे. वीज बिलांच्या माध्यमातून जनतेची लूट सुुरु आहे. तक्रार करण्यास गेल्यावर अगोदर बिले भरा, असे सांगितले जाते. महावितरणच्या या अन्यायकारक भूमिकेबाबत आमदार नाईक म्हणाले की, किती नागरिकांना वाढीव बिले आली आहेत. त्याचा परतावा त्यांना मिळाला आहे किंवा नाही? याची प्रभागनिहाय माहिती घेणार आहे. या सर्व ग्राहकांना रिफंड मिळाला नाही तर मात्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आमदार नाईक हे पावसाळा सुरु होण्यापूर्वी महावितरणच्या भांडुप परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांना वाशी येथील महावितरणच्या कार्यालयात लोकप्रतिनिधींसमवेत भेटले होते. त्यावेळी देखील पावसाळापूर्व वीजेची कामे करण्याबाबत आणि वीज समस्या सोडविण्याबाबत त्यांनी मागणी केली होती. मात्र एका ठिकाणचे काम झाले तर दुसर्या ठिकाणचे काम होत नाही, असा अनुभव येतो, असे आमदार नाईक म्हणाले. महावितरणची कामे पूर्णत्वाकडे जाण्यासाठी आवश्यकता असेल तर महापालिका, शासन अथवा इतर शासकीय यंत्रणांकडे आम्ही पाठपुरावा करु, अशी ग्वाही त्यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिली परंतु महावितरणने देखील जनतेसाठी पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उद्यडया केबल आणि उघडया डी.पीं.मुळे अपघात वाढले आहेत. अपुर्या वीज कर्मचार्यांमुळे कामे लवकर होत नाहीत अशा अनेक समस्या आहेत. सबस्टेशन आणि वीजविषयक कामांसाठी निधी मंजूर करुन घेतला आहे. त्यासाठी विधानसभेत लक्षवेधी सूचना, विभागीय चर्चा, मंत्रीस्तरिय बैठकांमधून वीजेची कामे होण्यासाठी पाठपुरावा केला आहे अशी माहिती देवून महावितरणने दिर्घकालिन योजना आखून वीज समस्यांचा काळोख नाहिसा करण्यासाठी प्रभावीपणे काम करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला. वीज समस्यांचा सामना करुन नागरिकांच्या सहनशीलतेचा आता कडेलोट झाला आहे. महावितरणने याची वेळीच गंभीर दखल घ्यावी, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देखील आमदार नाईक यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिला आहे.
आमदार नाईक यांच्यासमवेत अभियंता देशपांडे यांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळात नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, नगरसेवक लक्ष्मण पाटील, नगरसेविका मोनिका पाटील, नगरसेवक घनश्याम मढवी, परिवहन समितीचे माजी सभापती मोहन म्हात्रे कोळी समाजाचे नेते चंदू पाटील, परिवहन समितीचे सदस्य ऍड. जब्बार खान, माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील, ऐरोली विधानसभा युवक अध्यक्ष राजेश मढवी, सुदर्शन जिरगे, नरेंद्र कोटकर, मोहंमद मंसुरी, अनिल नाकते, राष्ट्रवादीचे वॉर्डअध्यक्ष कैलाश गायकर, राजेंद्र जोशी आदी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.