सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे सध्या राज्यभर जिल्हानिहाय संवाद दौरे २९ जून ते १८ जुलै २०१७ या कालावधीत सुरु असून नवी मुंबईत येत्या ९ जुलै रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात सकाळी १० वाजता कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे सध्या राज्यभर जिल्हानिहाय संवाद दौरे २९ जून ते १८ जुलै २०१७ या कालावधीत सुरु असून नवी मुंबईत येत्या ९ जुलै रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात सकाळी १० वाजता कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, लोकनेते गणेश नाईक, खासदार सुप्रियाताई सुळे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना लाभणार आहे. नवी मुंबई जिल्हा निरीक्षक मुनाफ हकिम, विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, युवती प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार नरेंद्र पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार निरंजन डावखरे, एपीएमसीमधील सर्व संचालक आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. पक्ष संघटना मजबूत करुन कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करुन नव्या जोमाने राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे काम सुरु होण्यासाठी या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष सुतार म्हणाले. राज्यातील व जिल्हयातील प्रलंबित नियुक्त्या जाहीर करण्याचे प्रयोजन देखील या दौर्यांमध्ये आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, नमुंमपाचे सभागृहनेते जयवंत सुतार, नमुंमपा स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई राष्ट्रवादीच्या सेलचे प्रमुख जिल्हा महिलाअध्यक्षा माधुरीताई सुतार, युवकअध्यक्ष सुरज पाटील, सेवादल अध्यक्ष दिनेश पारेख, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष ऍड.जब्बार खान, सेवादलाच्या महिलाअध्यक्षा आशाताई शेगदार तसेच इतर पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, युवक व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी, महिला व युवती संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील मान्यवर या दौर्याप्रसंगी आणि मेळाव्यास मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.