पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक सोमवार दिनांक १० जुलै रोजी होणार असून पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम महापौरपदासाठी भारतीय जनता पार्टी युतीच्यावतीने डॉ. कविता किशोर चौतमोल, उपमहापौरपदासाठी
रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका असलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या महपौरपदी भाजप कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गुरुवारी महापौर,उपमहापौर आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठीच्या निवडणुकीसाठीच्या शेवटच्या दिवशी भाजपने आपल्या उमेदवारांचे मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केले. नगरसचिव गणेश साळवी यांच्याकडे सायंकाळी ३ वाजून ४५ मिनिटांनी हे अर्ज दाखल केले. यावेळी भाजप रायगड जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख,रिपाईचे जिल्हाध्यक्ष जगदीशभाई गायकवाड,महानगरपालिका गटनेते परेश ठाकूर,तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत,शहराध्यक्ष जयंत पगडे,तालुका महिला मोर्चा अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
कोट –
आमदार प्रशांत ठाकूर ज्या पद्धतीने विकासकामे करीत आहेत, त्याचप्रमाणे सर्व नगरसेवकांनीही आपण स्वतःही आमदार असल्याचे समजून जनहिताची कामे करावीत.
-माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल हि राज्यातील पहिली नगरपालिका होती. आता ती रायगड जिह्यातील पहिली महानगरपालिका झाली आहे. स्वच्छ सुंदर स्मार्ट पनवेल २१ व्या शतकातील शहर म्हणून आकारात आहे. राज्यातील पहिल्या १० महानगरपालिकांमध्ये पनवेल महानगरपालिका जाईल यासाठी भाजपचे नगरसेवक चांगले काम करतील.
— परेश ठाकूर
भाजप गटनेते
महापौर पदासाठी मी अर्ज दाखल केला आहे याचे सर्व श्रेय भाजपला आहे.पक्षाचे ज्येष्ठ नेते लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याला मी पात्र ठरवून दाखवेन. सर्वांची साथ आहे आणि अशीच साथ मिळत राहील अशी अपेक्षा आहे. स्त्रियांच्या आरोग्यसेवेवर,सक्षमीकरणावर आणि दळणवळनाच्या समस्येवर प्राधान्याने काम करणार आहे.
— कविता किशोर चौतमोल
महापौर पदाच्या उमेदवार
हि निवडणूक लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढावीली. भाजपला एकहाती सत्ता पनवेलकरांनी दिली आहे.उपमहापौर पदाची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिलेली आहे. नगराध्यक्ष असताना केलेल्या कामाचा अनुभव याकामी उपयोगी ठरेल. रस्ते,पाणी आणि आरोग्यसेवा याबाबत प्राधान्याने काम करण्यावर आमचा भर राहणार आहे.
— चारुशीला घरत
उपमपौरपदाच्या उमेदवार
भाजप युतीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने पनवेल महानगरपालिकेवर भाजप युतीचा झेंडा फडकला आहे. महापौर,उपमहापौर आणि स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजप युतीने सुशिक्षित आणि अनुभवी उमेदवार दिलेले आहेत.
— अरुणशेठ भगत
भाजप तालुकाध्यक्ष
भारतीय संविधानानुसार अनुसूचित जातीच्या महिला उमेदवाराला महापौरपदाचा सन्मान मिळालेला आहे.लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी डॉ. कविता चौतमोल या सुशिक्षित उमेदवार दिलेल्या आहेत.त्या चांगल्याप्रकारे सोशल इंजिनिअरिंग करतील.
— जगदीशभाई गायकवाड
रिपाई जिल्हाध्यक्ष
लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्फत झालेल्या विकासकामांना आणि समाजसेवेला पनवेलकरांनी प्रतिसाद देत ७८ पैकी ५१ नगरसेवक निवडून दिले आहेत. भाजप युतीने जाहीर केलेल्या दशमान योजनेची अंमलबजावणी करण्याची आता वेळ आली आहे. स्मार्ट पनवेलसाठी भाजपचे सुशिक्षित उमेदवार प्रयत्न करतील असा विश्वास आहे.
— वाय टी देशमुख
भाजप जिल्हा प्रवक्ते