सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : प्लास्टिकमुक्त नवी मुंबई ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्याबाबत जनजागृती करण्याप्रमाणेच महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार प्लास्टिक पिशव्यांचा साठा व विक्री करणा-या व्यावसायिकांवर धडक कारवाई करण्यात येत आहे.
नवी मुंबई : प्लास्टिकमुक्त नवी मुंबई ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्याबाबत जनजागृती करण्याप्रमाणेच महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार प्लास्टिक पिशव्यांचा साठा व विक्री करणा-या व्यावसायिकांवर धडक कारवाई करण्यात येत आहे.
या अनुषंगाने तुर्भे सेक्टर 19 येथील कृषी प्लाझा मध्ये आजवरची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या तब्बल 101 गोणीतील 2200 किलो इतक्या मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या जप्त करून या प्लास्टिक पिशव्यांची वाहतुक करणारा टेम्पो क्रमांक एम.एच.04 जीएफ 8422 जप्त करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त शहर अंकुश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ 1 चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, तुर्भे विभागाच्या सहा. आयुक्त श्रीम. अंगाई साळुंखे आणि त्यांच्या सहकारी अधिकारी – कर्मचारी यांनी ही धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे.
त्याचप्रमाणे बेलापूर विभागात सेक्टर 11 येथील साईनाथ वाईन्स व परशुराम गावडे शॉप तसेच सेक्टर 50 नेरुळ येथील मोहन चौधरी शॉप, ओमकार मेडीकल ॲण्ड जनरल स्टोअर्स, भैरवनाथ डेरी आणि सेक्टर 15 सीबीडी बेलापूर येथील शिवआरती डेअरी या सहा दुकानांमधून 7 किलो 300 ग्रॅम इतका 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा साठा जप्त करून प्रत्येकी 5000/- प्रमाणे 30 हजार इतकी दंडात्मक रक्कम बेलापूर विभागाच्या सहा. आयुक्त श्रीम. प्रियांका काळसेकर यांच्या वतीने वसूल करण्यात आली.
अशाप्रकारची प्लास्टिक विरोधी मोहीम संपूर्ण नवी मुंबई शहरात व्यापक स्वरुपात राबविण्यात येत असूनप्लास्टिकचा साठा व विक्री करणा-या व्यावसायिकांनी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे तसेच नवी मुंबईकर नागरिकांनीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा व कागदी / कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.