नवी मुंबई –:घणसोली सेक्टर नऊ मधील एका इंग्रजी माध्यमाच्या शिशु वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शुल्लक कारणा वरून डस्टर व हाताने मारहाण केली.त्या बालकाची मानसिक स्थिती ढासाळल्याने गेले तीन दिवस त्याला बोलताही येत नव्हते.तसेच त्याला तापही आला होता.त्यामुळे संबंधित शिक्षिकेवर कारवाई करावी अशी मागणी त्या बालकाच्या नातेवाईकांनी रबाले पोलिसां कडे केली आहे.
घणसोली येथील एएचपी नावाची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.या शाळेत शिशु वर्गात नक्ष मढवी हा साडेचार वर्षीय मुलगा शिक्षण घेत आहे.नेहमी प्रमाणे मंगळवारी शाळेत गेला.त्यादिवशी वर्ग शिक्षिका श्रीरूपा दास यांनी नक्ष मढवी ला मुलींच्या रांगेत बसविले होते.म्हणून नक्ष यांनी आपल्या शिक्षिकेची परवानगी न घेता मुलांच्या रांगेत आला.याचा शिक्षिका श्रीरूपा दास याना राग आला.म्हणून शिक्षिका दास यांनी नक्ष याला हाताने व डस्टरने कपाळावर ,पाठीवर मारले अशी माहिती नक्षचे वडील मिलिंद मढवी यांनी दिली.
मंगळवारी नक्षची आई नूतन ह्या आपल्या मुलाला आणण्यासाठी शाळेत सकाळी आकरा वाजता गेल्या असता मुलाची अवस्था पाहून हादरल्या. त्यांनी तत्काळ ठाणे येथील नौपाडा येथील डॉ.वाकडे यांच्या रुग्णालयात दाखल केले.परंतु नक्षचा ताप काही उतरत नव्हता व बोलता येत नसल्यामुळे त्यांनी घणसोली सेक्टर 5 येथील न्यू लाईफ रुग्णालयात दाखल केले.
शिक्षिकेच्या मारहाण व मानसिक तणावाखाली मुलगा असल्याने त्याच्या भविष्याची चिंता त्यांच्या आई वडिलांना लागली असल्याचे मुलाचे आजोबा अनंत पाटील यांनी सांगितले.जर त्याचा शाळे वरील विश्वासच उडाला तर तो शिक्षण कसे घेईल असाही प्रश्न त्यांना सतावत आहे.गेले तीन दिवस नक्ष एक साधा शब्द बोलत नव्हता.परंतु नक्ष आता एक एक शब्द बोलत असल्याचे त्याचे वडील मिलिंद मढवी यांनी सांगितले.
या घटने नंतर गुरुवारी सायंकाळी नक्षचे वडील मिलिंद मढवी यांनी त्या शिक्षके विरोधात कारवाई करावी म्हणून तक्रार पत्र दिले आहे.या बाबत पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार याना विचारले असता ,चौकशी करून गुन्हा नोंदविण्यात येईल असे सांगितले.