सातत्यपूर्ण करवाई न झाल्यास आमदार नरेंद्र पवार हक्कभंगच्या ठरावावर ठाम
स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
कल्याण : कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसर आणि स्काय वॉकवर बस्तान मांडणाऱ्या फेरिवाल्यांवर गुरुवारी केडीएमसी आणि पोलिस प्रशासनाने धडक करवाई करीत १५ फेरिवाल्यांना महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेतले. कल्याण पश्चिमचे आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार यांनी फेरिवाल्यां विरोधात सक्त कारवाई न केल्यास रेल्वे प्रशासन, केडीएमसी प्रशासन आणि पोलिस प्रशासन प्रमुखांवर हक्कभंगच्या ठराव मांडण्यावर ठाम असल्याचा पुन्नरउच्चर केल्याने ही जोरदार करवाई केली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.
फेरीवाले आणि अस्वच्छतेमुळे कल्याण पश्चिम स्टेशन परिसराचे बकालीकरण झाले आहे. तसेच फेरीवाल्यांनी स्कायवॉकवर आपले बस्तान बसविल्यामुळे नागरिकांनी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या बजबजपुरीमुळे जेरिस आलेल्या नागरिकांनी भाजपा आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे तक्रारारी केल्या होत्या. यानंतर आमदार नरेंद्र पवार यांनी स्टेशन परिसरातील परिस्थिती १५ दिवसात न बदलल्यास येत्या पावसाळी अधिवेशनात केडीएमसी आयुक्त, रेल्वे प्रशासनाचे विभागीय व्यवस्थापक आणि ठाणे पोलिस आयुक्त यांच्यावर हक्कभंगाचा ठराव मांडणार असल्याचे स्पष्ट केले. याबाबत तिन्ही प्रमुखांना पत्रव्यवहार करून त्यांना सूचना केल्या. मात्र यानंतर समाधानकारक करवाई न झाल्यामुळे संतप्त आमदार नरेंद्र पवार यांनी हक्कभंगच्या ठराव मांडण्याबाबत पुन्नरउच्चार केल्याने तिन्ही प्रशासन्याच्या माद्यमातुन गुरुवारी संध्याकाळी कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात आक्रमक कारवाई करीत, तब्बल १५ फेरिवाल्यांचा माल जप्त करीत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या धडक कारवाईमुळे फेरिवाल्यांमध्ये दहशतीचे वातवरण पसरले असून नागरिकांनी या कारवाईमुळे समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान सदरच्या कारवाईत सातत्य नसल्यास येत्या पावसाळी अधिवेशनात हक्कभंगच्या ठरावावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.