स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने सन 2017-18च्या अर्थसंकल्पामध्ये नवी मुंबई कौशल्य व उद्योजकता विकासाबाबत आर्थिक तरतूद केली आहे, त्याबाबत महापालिका प्रशासनाने आजतागायत काय कार्यवाही केली आहे, याची माहिती नवी मुंबई युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उप विधानसभा युवा अधिकारी निखिल रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून मागितली आहे.
नवी मुंबई कौशल्य व उद्योजकता विकास अभियान व उद्योजकता अर्थसहाय्य या माध्यमातून नवी मुंबई कार्यक्षेत्रातील औद्योगिक विभागात 6 ठिकाणी महापालिका प्रशासन प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याचे अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. नवी मुंबईतील बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि त्यातून त्यांच्या परिवाराला हातभार लागावा हा यामागील मनपा प्रशासनाचा हेतू आहे. या अभियानाची अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासनाने आजवर काय केले आहे, कोणकोणत्या एमआयडीसी भागात सर्व्हे करून जागा निश्चित केली आहे, आजवर या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मनपा प्रशासनाने काय केले याची माहिती युवा सेनेचे निखिल रतन मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे मागितली आहे.