** रायगड जिल्ह्यासाठी ६ डिव्हिजन कार्यरत ** ९४ टक्के नोंदणी पूर्ण ** नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम
स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
पनवेल : जुन्या केंदीय उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेलमधील मुख्य कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जुन्या नोंदणीकृत खातेदारांचे रूपांतर तात्पुरत्या जीएसटी क्रमांकाने जीएसटी खात्यात झाले आहे. सदर खात्यांचे स्थायी खात्यात रूपांतर करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ३० जुलै २०१७ हि अंतिम तारीख आहे.सध्या रायगड जिल्ह्यासाठी प्रस्तावित तात्पुरत्या जीएसटी क्रमांकाने ९४ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरु आहे.
प्रशासनाने नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. जुने राज्य उत्पादन शुल्क खातेसुद्धा एसजीएसटी साठी काम करीत असून सध्या एसजीएसटी आणि सीजिएसटी दोन्ही खाती जीएसटीबाबत नागरिकांमध्ये सकारत्मक वातावरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. देशात १ जुलैपासून जीएसटी करप्रणालीची सुरवात झाली आहे. पूर्वी साधारणपणे १६% उत्पादन शुल्क, १३% विक्रीकर आणि ओकट्राय ५.५%, म्हणजेच एकूण ३४.५% इतका कर ज्या वस्तूंवर लागत होता त्यावर आता जातीतजास्त २८% इतका जीएसटी लागणार आहे. विशेष म्हणजे देशातील सेवांवर सारखाच कर तसेच वस्तूंवरही सारखाच कर लागणार आहे. त्याशिवाय कोणती वस्तू कोठे गेली याचे ट्रेसिंग होण्यासाठी नव्या रिटर्न प्रक्रियेत सुलभ होणार आहे. त्यामुळे काळाबाजार बंद होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी जीएसटीला हिरवा कंदील दिलेला आहे. नागरिकांमध्येसुद्धा संभ्रम दूर व्हावेत यासाठी पप्रशासन जनसाजगृती मोहीम घेत आहे. ज्या व्यापाऱ्याचे उत्पन्न वार्षिक २० लाखांपर्यंत आहे त्यांना जीएसटीची नोंदणी आवश्यक नाही. मात्र त्यांना तिमाही रिटर्न भरणे आवश्यक आहे. मासिक रिटर्नचे तीन प्रकार आहेत. महिन्याच्या १० तारखेला जीएसटीआर १ भरावा लागणार ज्यामध्ये एक्सपोर्ट,इम्पोर्ट,ट्रेडिंग,रिपेअरिंग अशा पुरवठ्याबाबतच्या आवक केलेल्या बाबी शासनाला दाखवाव्या लागतील. जीएसटीआर २ हा १५ तारखेला भरायचा आहे ज्यामध्ये जावक बाबी दाखवायच्या आहेत. त्यानंतर अंतर्गत मॅचिंग होऊन सिबिल रिपोर्ट तयार होणार आहे. जीएसटीआर ३ हा २० तारखेला भरायचा आहे. यासाठी रायगड आयुक्तालय अंतर्गत ६ डिव्हिजन कार्यरत आहेत. नागरिकांना जीएसटीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हास्तरावर मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सध्या या यंत्रणेमार्फत नागरिकांना जीएसटीबाबत जनजागृती केली जात आहे. कशापद्धतीने नागरिकांचा आणि व्यापाऱ्यांचा प्रतिसाद आहे याचाही विचार या यंत्रणेमार्फत बघितला जात आहे. पनवेल मधील व्यापाऱ्यांना जीएसटीबाबतच्या माहितीसाठी हेल्प डेस्क जुन्या आयकर भवन कार्यालयात,शेजारील ट्रायफेड टॉवरमध्ये उपलब्ध आहे. तळोजा एमआयडी मध्ये टीएमएच्या कार्यलयातसुद्धा जीएसटी हेल्प डेस्क आहे. अधिक माहितीसाठी सुप्रिटेंडंट नारायण सोमय्या यांच्याशी 022-27492330 या क्रमांकावर संपर्क करू शकता.
नव्या यंत्रणेवर केलेल्या डिव्हिजन डिव्हिजन
१ :- म्हसळा आणि श्रीवर्धन डिव्हिजन
२ :- महाड,पोलादपूर,माणगाव डिव्हिजन
३ :- मुरुड,तळा,रोहा, डिव्हिजन
४ :- अलिबाग अलिबाग
५ :- खोपोली,सुधागड,पेन,कर्जत,खालापूर,पनवेल अलिबाग
६ :- तळोजा,कळंबोली,कामोठे आणि खारघर