कळीदार कपुरी पान,कोवळं छान,रंगू दे विडा
बाबुराव खेडेकर
पनवेल : पनवेल महानगरपालिकेत सहभागी झालेल्या सिडको वसाहतीमधील नागरिकांना पनवेल मध्ये पूर्वी उत्कृष्ट पान मिळत असेल म्हणून पनवेल नाव पडले असा समज आहे.या गोड समज झालेल्यांमध्ये पान शौकीन जास्त आहेत. मात्र त्यांची निराशा दोन कारणांसाठी होते, एक म्हणजे पनवेलमध्ये त्यांना हवे असे ‘रंगत’दार पान मिळत नाही आणि दुसरे म्हणजे पानवेल वरून पनवेल हे नामकरण विड्याच्या पानासाठी नसून पानवेलीसाठी झालेले आहे. तलावांचे शहर या बिरुदावलीला साजेसे हे नामकरण असल्यामुळे पानाची रंगत नसली तरी नावाची रंगत कुठेही कमी पडलेली नाही.
पु ल देशपांडे यांनी पानवाल्याचे यथार्त चित्रण केलेले आहे. भारतीय लोक आणि पान असे समीकरण आहे. पनवेल हे सुद्धा मेट्रोपॉलिटन शहर आहे. भारतातील अनेक भागातून लोक येथे राहायला आलेले आहेत. भरपेट जेवण झाल्यावर पानाचा विडा खाणे व्यसन न्हवे आरोग्यदायी आहे. परंतु त्यात तंबाखू आणि इतर रंग,रसायन मिश्रीत प[पदार्थ टाकल्यास ते आरोग्यासाठी धोकादायक असते.नावाप्रमाणे पनवेलचे पान जिभेवर अनेक तास रेंगाळेल हि अपेक्षा फोल ठरते. अन्य ठिकाणची पाने तासनतास जिभेवर रेंगाळतात मात्र पनवेलचे पान स्मरणात राहत नाही अशी पान शौकिनांची खंत आहे. तरीही निराश होण्याचे कारण नाही. पनवेलमध्ये कांही ठिकाणी स्मरणात राहणार नसले तरी समाधान होईल असे पान मिळते त्यात पनवेलच्या एस टी स्थानकासमोर दोन पानवाले आहेत,आदर्श हॉटेल शेजारी अरुण पान शॉप आहे. कापड बाजार मध्ये एक पानवाला आहे. शेजारील पटेल मोहल्ला येथील पानवाला कात स्वतः बनवितो. पनवेल पॅलेस शेजारी एक पानवाला आहे तेथील कलकत्ता मसाला पान हे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळते. पळस्पे येथील वेलकम हॉटेल शेजारी असलेल्या पानवाल्याकडे ‘बोलती बंद’ नावाचे पान खूप फेमस आहे. नवीनपनवेल मध्ये शबरी हॉटेल जवळ एक पानवाला आहे.त्याच्याकडे चांगल्या दर्जाचे पान मिळते. सेक्टर ९ मध्ये विजय चौहान यांचे एक पान शॉप आहे. वेगवेगल्या प्रकारचे मुखवास येथे आहेत.तसेच नवीन पनवेलमध्ये पलंगतोड पान हा प्रकारही चांगलाच प्रसिद्ध आहे. खारघर मधील गरम मसाला हॉटेल समोर एक पानवाला आहे त्याच्याकडे मगई पान चांगले मिळते म्हणून लोक गर्दी करतात. तसेच नवीन पनवेलमध्ये पलंगतोड पान हा प्रकारही चांगलाच प्रसिद्ध आहे.सेक्टर २० मध्ये हॉटेल चेट्टीनाड समोर एक दर्दी पान विक्रेता आहे. त्याच्याकडील पान महागडे पण जिभेवर रेंगाळणारेआहे. खारघरची खाद्य संस्कृती सध्या पनवेल प्रमाणेच बहरत आहे यात शंका नाही.
एकंदरीतच नगर असलेले पनवेल आता महानगर झालेले आहे. पानवेलचे पनवेल झालेले आहे. मात्र पनवेलमध्ये रंगतदार पान मिळत नाही हि खंत होती ती आता पनवेलचे भौगोलिक क्षेत्र वाढल्यामुळे इतर भागानी भरून काढली आहे असेच म्हणावे लागेल. पान हे क्वचित प्रसंगी खाल्यास पाचक आणि आरोग्यदायी आहे मात्र व्यसन म्हणून त्याच्या आहारी जाऊ नका.