स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
पारदर्शक कारभार आणि विकास प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकाला सामावून घेण्यासाठी ‘मेरा शहर, मेरा सुझाव’ उपक्रमाची सुरूवात
मिरा भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा थेट मतदारांच्या सुचनांच्या आधारे तयार करण्याचा अनोखा प्रयोग मिरा भाईंदर शहर भाजपातर्फे राबविण्यात येणार आहे. ‘मेरा शहर मेरा सुझाव’ या उपक्रमाच्या माध्यमातून हा प्रयोग राबविला जाणार असून नागरिकांच्या सूचनांसाठी ३१ जुलैपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. महापालिका प्रशासनातील पारदर्शकता वाढवणे तसेच विकासाच्या प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकाला सामावून घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची प्रतिक्रिया मा. आमदार श्री. नरेंद्र मेहता यांनी दिली.
आज सेव्हन स्क्वेअर अॅकेडमी स्कुल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या उपक्रमाबाबतची माहिती देताना मा. आमदार नरेंद्र मेहता म्हणाले की, सबका साथ, सबका विकास या भाजपच्या घोषवाक्यात देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या विकास प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांना सामावून घेण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग अाहे. मिरा भाईंदर गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने प्रगती करत आहे. या प्रक्रियेत राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचे आपल्याला चांगले सहकार्य लाभले आहे. आता या प्रक्रियेत नागरिकांनाही सामावून घेण्याची वेळ आली असून, या उपक्रमाचे मिरा भाईंदर शहरातील नागरिक उत्फुर्तपणे स्वागत करतील, याबद्दल आपल्याला विश्वास असल्याचे सांगत मा. मेहता म्हणाले की, नागरिकांच्या सुचनांच्या आधारे आम्ही एक आदर्श असा जाहीरनामा तयार करण्यात यशस्वी होऊ. मेट्रो ७ चा मिरा भाईंदरपर्यंत विस्तार आणि सुर्या विभागिय पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून २१.८ कोटी लीटरचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. शहरातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच वाहतुकीच्या सुविधांची गरज लक्षात घेऊन या योजनांच्या मंजुरीसाठी आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. आता या पुढच्या टप्प्यावर नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत, हे आम्हाला या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला समजेल, त्यानुसार आम्ही पुढील पावले उचलणार असल्याचेही ते म्हणाले.
आपल्या शहराच्या विकासाबद्दल नागरिकांच्या काही संकल्पना असतात. त्याचसोबत महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडूनही नागरिकांच्या काही अपेक्षा असतात. या संकल्पना आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी शहरातील मॉल्स, बाजारपेठा, रेल्वे स्टेशन्स आणि इतर काही महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी शहर भाजपातर्फे सूचना पेट्या ठेवण्यात येतील. या शिवाय http://merasujhav.com/ या