केअर ऑफ नेचरच्या माध्यमातून उपक्रमांची पूर्तता ** हजारो विध्यार्थ्यांना लाभ
पनवेल /बाबुराव खेडेकर
रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज आणि केअर ऑफ नेचर या सामाजिक संस्थेच्यावतीने क्लबचे युथ डायरेक्टर राजू मुंबईकर यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून सोमवारी (दिनांक २४ जुलै) एकाच दिवशी सहा प्रकल्पांची पूर्तता करण्यात आली. यावेळी रोटरीच्या पदाधिकाऱ्यांसह केअर ऑफ नेचरचे सदस्य उपस्थित होते. या विविध कार्यक्रमांतर्गत हजारो विध्यार्थ्यांना लाभ भेटला आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारी केअर ऑफ नेचर आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज यांच्या वतीने वेश्वी येथील आदिवासीवाडीच्या शाळेच्या २५ मुलांना खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. यामुलांना प्रथमच अशाप्रकारचे साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. त्याचबरोबर दुसऱ्या एका कार्यक्रमात चिरनेर आश्रमशाळेतील ४५ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले तर २०० विद्यार्थ्यांना वह्या आणि क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत सर्वात महत्वाचा आणि ;लक्षवेधी प्रकल्प ई लर्निंग संचाचा आहे. रानसई येथील आदिवासी शाळेची ई लर्निंग संचाची अनेक दिवसांची मागणी रोटरी आणि केअर ऑफ नेचरच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली. याच शाळेतील ३०० विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले. तसेच नेरे येथील शांतिवनात ५० कुष्टरोग्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
अशाप्रकारे राजू मुंबईकर यांनी आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. या कार्यक्रमाला रोटरी क्लब पनवेल सनराईजचे प्रेसिडेंट मदन बडगुजर,डॉ दीपक खोत,डॉ कुलकर्णी उपस्थित होते. तसेच उद्योजक राजाशेठ खारपाटील,मढवी गुरुजी,मुख्याध्यापक ए जी मोरे,किशोर शिरपूरकर,शांतिवनचे शिबीर संचालक श्री. कोळी आदी उपस्थित होते.