स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
कायमच्या वाहतुक कोंडीतून मिरा
मिरा भाईंदर : मिरा भाईंदर परिसरातून मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या वसई पुलाच्या ठिकाणी नवा चौपदरी पुल बांधण्याचे काम अवघ्या २३ महिन्यात पुर्ण केले जाणार असल्याची माहिती आ. नरेंद्र मेहता यांनी दिली आहे. परिणामी जुन्या पुलाच्या नियमित दुरूस्तीच्या कामामुळे वर्षातून सहा ते आठ महिने पुल बंद ठेवाव्या लागण्याच्या कटकटीतून तसेच त्यामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीच्या समस्येतून मिरा भाईंदरवासियांची कायमची सुटका होणार आहे. आ. नरेंद्र मेहता यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे बराच काळ रखडलेल्या या प्रकल्पाचे काम मार्गी लागल्याने मिरा भाईंदरकरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जुन्या आणि अरुंद अशा वसई पुलाच्या जागी नवा चौपदरी पुल बांधण्याच्या कामाला ३० जुनपासून सुरूवात करण्यात आली अाहे. बराच जुना असलेला हा पुल दुरुस्ती आणि देखभालीच्या कारणास्तव वर्षातून सहा ते आठ महिने बंदच ठेवावा लागत असे. गेल्या वर्षी तर सप्टेंबरमध्ये वाहतुकीसाठी हा पुल बंद करण्यात आला, तो थेट या वर्षीच्या एप्रिलमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. परिणामी पुल बंद असलेल्या कालावधी दरम्यान वाहतुक कोंडीची समस्या जणु मिरा भाईंदरकरांच्या पाचवीलाच पुजली होती. याबाबत वारंवार मागणी करुनही प्रशासन दाद देत नव्हते. अखेर मेहता यांनी हा प्रश्न सोडवण्याचे ठरवले. त्यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची गतसालच्या आॅक्टोबर महिन्यात भेट घेऊन मिरा भाईंदरांची गैरसोय करणाऱ्या या पुलाच्या पुनर्बांधणीबाबत चर्चा केली, तसेच या प्रस्तावावर विचार करून नव्या पुलाच्या कामाला तातडीने मंजुरी द्यावी, अशी विनंतीही केली. मेहतांच्या या पाठपुराव्याची योग्य ती दखल घेत गडकरी यांनी तातडीने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवत पुलासाठी १४७ कोटींचा निधीही मंजूर केला. तसेच महापालिका निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन हा प्रकल्प आचारसंहितेच्या कचाट्यात सापडू नये यासाठी ३० जूनपासून तातडीने कामाला सुरूवातही केली. आता या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून २३ महिन्यांच्या नियोजित कालावधीत हे काम पुर्णसुद्धा होईल, असा विश्वाससुद्धा आ. मेहतांनी व्यक्त केला.