स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई :- गौरी गणपतीच्या सणांना मराठी शाळांना पाच दिवसाची सुट्टी असते. पण इंग्रजी माध्यम, कॉन्व्हेंट शाळा, दिल्ली व आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांना या सणाच्या कालावधीत सुट्टी दिली जात नाही. या उत्सवाचे धार्मिक महत्व लक्षात घेता नवी मुंबई महापालिका शिक्षण मंडळाने 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशी सात दिवसाची सुट्टी जाहिर करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
मराठी शाळांना पाच दिवसांची तर इंग्रजी शाळांना गणेशोत्सवाच्या कालावधीत फक्त एकच दिवसाची सुट्टी देण्यात येत असल्याचे सांगून आपल्या निवेदनातून सुरज पाटील यांनी नवी मुंबईत असलेला कोकणस्थ समाज व गणेशोत्सवाचे महत्व विषद केेले आहे. महापालिका शिक्षण मंडळाने गणेशोत्सवाच्या सुट्टीचा निर्णय जुलैमध्येच जाहिर केल्यास कोकणवासियांना व अन्य भागातील लोकांना रिर्झव्हेशन करणे सोपे जाईल व सणही त्यांना उत्साहात साजरे करण्यास सोपे जाईल असे सुरज पाटील यांनी म्हटले आहे.