दिपक देशमुख
महापालिकेच्या आरोग्य विभागाचेे निघातायत नवी मुंबईकरांमध्ये वाभाडे
नवी मुंबई : मनपाच्या रुग्नालयात महत्वाच्या रक्त चाचण्या होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या तीन दिवसापासून रक्त चाचण्या होत नसल्यामुळे शकडो रुग्ण माघारी जाऊन खाजगी लॅबोरेटरी मध्ये जाऊन आर्थिक परिस्थिती कमजोर असणार्या नागरिकांना याचा चांगलाच फटका बसत आहे.यामुळे मनपाच्या मुख्य कार्यालयातील आरोग्य विभाग नक्की काय काम करत आहे असा प्रश्न विचारला जात आहे.
मनपाच्या ऐरोली व नेरूळ येथील रुग्नालयात मूत्रपिंड, लिव्हर व मधूमेहाच्या चाचण्या होत नाहीत म्हणून त्या रुग्नालयातील रुग्णांना वाशी येथील रुग्णालयात पाठवले जाते. वाशी रुग्णालयातील शेकडो रुग्णांना देखील डॉक्टर या चाचण्या करण्यास सांगत आहेत. परंतु तीनही महत्वाच्या चाचण्यांचे किट आले नसल्यामुळे करण्यात येत नसल्याने अनेक रुग्णांना आड़चणींचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
ऐरोली व नेरूळ येथे मनपाने कोट्यवधी रुपये खर्च करून रुग्नालये निर्माण केली. ही रुग्णालये सुरु होऊन तीन वर्षे उलटून गेली तरी महत्वाच्या चाचण्याही येथे होत नसल्यानं गरोदर माता तसेच शस्त्रक्रिया साठी ठेवलेल्या रुग्णांना भयानक त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.कोणतीही शस्त्रक्रिया करताना तिन्ही रक्त चाचण्या कराव्याच लागत असल्याने रुग्ण हजारो रुपये खर्च करून खाजगी ठिकाणी करून घेत आहेत.
या चाचण्या होत नसल्यामुळे वाशी रुग्नालयातील रुग्णांना याचा चांगलाच फटका बसत असल्याचे परशुराम उबाळे यांनी सांगितले.मध्यमेहाची रक्त चाचणी सुद्धा होत नसल्याने त्या रुग्णांना खाजगी ठिकाणी जाऊन आपली टेस्ट करून घ्यावी लागत असल्याचे रुग्नांचे म्हणणे आहे.त्यामुळे मनपा आरोग्य प्रशासनाने याचा मानवतावादी दृष्टीकोन ठेऊन अशी परिस्थिती येऊ नये म्हणून तत्परता दाखवावी अशी मागणी अनेक रुग्ण करत आहेत.
या बाबत मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपक परोपकारी यांच्याशी संपर्क साधला असता,रक्त चाचण्यांचे किट संपले असतील तर सोमवार पर्यंत आणण्याची तजवीज करतो असे सांगितले.