सुजित शिंदे
नवी मुंबई : सोशल मिडीयावर सक्रिय असणार्या अधिकाधिक नवी मुंबईकरांना राष्ट्रवादी काँग्रेसची सोशल मिडीयाची टीम एव्हाना चांगलीच परिचित आहे. त्यातील कोणी बुध्दीवादाचे प्रामाण्य देत विरोधकांना सक्षम उत्तरे देतो, तर कोणी आक्रस्ताळेपणा करत विरोधकांवर प्रतिहल्ला करतो, तर कोणी शालजोडीतील टोमणे मारत विरोधकांना नामोहरम करतो. हीच राष्ट्रवादी काँग्रेसची सोशल मिडीया सामाजिक कामातही आपले योगदान देत असते. महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा आणि ठाणे -रायगड जिल्ह्यात नवी मुंबईचे विकासपर्व म्हणून ओळखल्या जाणार्या आमदार संदीप नाईकांच्या जन्मदिनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मिडीयाच्या टिमने गोरगरीबांना आहाराचे वाटप पुन्हा एकवार आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन नवी मुंबईकरांना घडवून दिले आहे.
राहूल शिंदे, विठ्ठल बांगल, देवनाथ म्हात्रे, जयंत म्हात्रे, हरिश भोईर, काशिनाथ तिडके, सुनील म्हात्रे आदी घटक गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसची सोशल मिडीया सक्षमपणे सांभाळत आहेत. सोशल मिडीयावर आक्रमकता दाखविणार्या या टीमचा सामाजिक बांधिलकीचा एक दुसरा चेहराही नवी मुंबईकरांसाठी आजही काही प्रमाणात अपरिचित आहे. 4 ऑगस्ट रोजी आमदार संदीप नाईकांच्या जन्मदिनी वाशी रेल्वे स्थानक, शहरातील सिग्नल, उद्याने, सार्वजनिक जागा आदी ठिकाणी आढळून आलेल्या गरीब मुलांना एकत्रित करून या टीमने त्यांना बर्गर, पिझ्झा आणि कोल्ड ड्रीक दिले. सर्वसामान्य नेहमीच बर्गर, पिझ्झा आणि कोल्ड ड्रींकचा आस्वाद घेतात. आमदार संदीप नाईकांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून या दिनी गोरगरीब मुलांना आम्ही हे खाण्यास दिले, त्यांनाही याचा आस्वाद चाखावयास मिळाला पाहिजे याच भूमिकेतून आम्ही हा उपक्रम शहरामध्ये ठिकठिकाणी राबविला असल्याची माहिती राहूल शिंदे यांनी दिली.