नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रतिष्ठेची व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर मानली जाणारी सारसोळे कोळीवाड्याची नारळी पौर्णिमा उत्साहात व पारंपारिक नृत्याच्या आविष्कारामध्ये पार पडली. एक हजाराहून अधिक लोक सारसोळेच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.
नवी मुंबईत ठिकठिकाणी नारळी पौर्णिमा साजरी करण्यात येत असली तरी गेल्या काही वर्षात सारसोळे कोळीवाड्यातून ग्रामस्थ आणि कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून साजरी करण्यात येणारी नारळी पौर्णिमा बहूचर्चित व आकर्षणाचा विषय बनली आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सारसोळे कोळीवाड्यातील कोलवाणी मातेच्या मंदिरापासून पालखी सोहळ्यास सुरूवात झाली. कोळी समाजातील पुरूष, महिला आणि मुले पारंपारिक वेशामध्ये या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
या पालखी सोहळ्यामध्ये देवीचे दर्शन घेण्यासाठी व पालखीला खांदा लावण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व नवी मुंबईचे शिल्पकार, लोकनेेते गणेश नाईक सहभागी झाले होते. याशिवाय भाजपाचे युवा नेते वैभव नाईक, सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे गोवा राज्य सहसंपर्कप्रमुख नामदेव भगत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील, ब प्रभाग समिती अध्यक्षा सौ. रूपाली किसमत भगत, प्रभाग 85च्या कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील, नगरसेवक गिरीश म्हात्रे, शिवसेनेचे नगरसेवक सोमनाथ वासकर, ज्ञानेश्वर सुतार, नगरसेविका सौ. कोमल वासकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन मांडवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत, किसमत भगत, रवी भगत, एकनाथ ठाकूर, शिवसेना शाखाप्रमुख शैलेश भोईर, युवा सेनेचे बेलापुर विधानसभा उपविधानसभा अधिकारी निखिल रतन मांडवे, राष्ट्रवादीचे यशवंतमामा तांडेल, तुकाराम टाव्हरे, महादेव पवार, पद्माकर मेहेर, शरद पाजांरी, गौतम कांबळे, वाघमारे, सुरेश मोरे यांच्यासह राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर सहभागी झाले होते.
मिडीयामध्येही सारसोळेच्या कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेचे महत्व अलिकडच्या काळात वाढीस लागल्याने ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील, मिलिंद तांबे, योगेश शेटे, सुजित शिंदे, छायाचित्रकार संदेश रेणोसे, बच्चनकुमार यांच्यासह विविध पत्रकार व छायाचित्रकारही यावेळी उपस्थित होते.
सारसोळे कोळीवाडा ते पामबीच मार्गावर असणारी सारसोळेची जेटी यादरम्यान सुमारे दोन तास निघालेल्या या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांची पारंपारिक वेशातील नृत्ये कमालीचे आकर्षण बनले होते. जेटीवर पालखी आल्यावर आरती घेवून या पालखी समाप्त करण्यात आली. त्यानंतर सारसोळे ग्रामस्थांच्या होड्या नारळ खाडीमध्ये सोडण्यासाठी रवाना झाल्या. खाडीमध्ये नारळ सोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत स्वत: शेवटपर्यत उपस्थित होते. त्यांनी नारळ खाडीला समर्पित करून सारसोळे कोळीवाड्यांतील लोकांना मत्स्य व्यवसायात मदत करण्यासाठी खाडीकडे प्रार्थना केली.
हा नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजक कोलवाणी माता मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सारसोळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला नेरूळ पोलिसांनीही कमालीचे सहकार्य केल्यामुळे हा पालखी सोहळा व नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात पंरतु शिस्तबध्दरित्या पार पडल्यामुळे स्थानिक नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी नेरूळ पोलिसांप्रती यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.