पनवेलच्या ढोलपथकांवर थिरकणार मुंबई नवीमुंबई
पनवेल : बाबुराव खेडेकर
डीजेच्या आक्रमणामुळे ढोल-ताशे हा वाद्यप्रकार मागे पडला होता. स्वस्तातील डीजेमुळे वाढणारे ध्वनीप्रदूषण आणि विविध आजारांना मिळणारे आमंत्रण याची दखल न्यायालयाने घेतली असून डीजेवर सरसकट बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पारंपारिक वाद्यांना मागणी वाढणार आहे. त्यात ढोल-ताशे यांचे स्फूर्ती देणारे वादन येणार्या सण-उत्सवात कानी पडणार आहे. पनवेल परिसरात गेल्या तीन वर्षांपासून ब्रह्मा ढोल-ताशा पथकाचा निनाद सर्वत्र दुमदुमत आहे. आगामी सण-उत्सव विशेष करुन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या ढोल पथकातील कलावंतांचा कसून सराव सुरू आहे. पनवेलमध्ये 12 ढोलपथक आहेत. त्यांना मुंबई, नवी मुंबई मध्ये जोरदार मार्गाने आहे.
महाराष्ट्राची परंपरा सांगणार्या अनेक गोष्टी आहेत. त्यात ढोल-ताशा ही दोन्ही वाद्ये महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपणारी वाद्यं म्हणून ओळखली जातात. ही वाद्ये शिवरामांच्या स्वराज्यात विजमी मिरवणुका व सणवारांना मावळ्यांकडून वाजवली जात असतं. म्हणून काही ठिकाणी यांना मावळ ढोल-ताशे असं म्हटलं जात असावं. रणांगणामध्ये वीरांना लढण्यासाठी स्फूर्ती देण्यासाठी रणंवाद्यं म्हणून देखील ही वाद्ये वाजवली जात असल्याबाबतच्या नोंदी इतिहासात आढळतात.
महाराष्ट्रात ढोल-ताशांची परंपरा जिवंत ठेवण्यामध्ये पुणे शहरातील ढोल-ताशा पथकांचा मोलाचा वाटा आहे. त्यानंतर नाशिक ढोलचा क्रमांक लागतो. गणेशोत्सव, गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणार्या स्वागत मिरवणुकीत ढोल-ताशांचे स्वर कानी पडत असतात. ढोल ताशांची ही संस्कृती गेल्या काही वर्षात पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पनवेल, नवीन पनवेल, कामोठे आणि खारघर परिसरात जवळपास एक डझन ढोल पथक आहेत. त्यात युवानाद, नादस्फूर्ती, स्वरगर्जना, शिवशंभो, ब्रह्मा, उत्सव अशी ढोल पथके पनवेलच्या नावलौकिकात भर टाकत आहेत. डीजेला वैतागलेल्यांना ढोल-ताशांची भुरळ पडली आहे, असं म्हटलं तर वावग ठरु नये.
महाराष्ट्रातील अठरा पगड जातीच्या लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाद्ये वाजवली जातात. त्यामध्ये ढोल हे वाद्य बहुतांश जातीच्या-जमातीच्या लोकांमध्ये वेगवेगळ्या सणांना वाजविलं जातं. धनगरी ढोल, आदिवासी लोकांचा ढोल ज्याचा सर्वात जास्त वापर सिने संगीतामध्ये प्रसिद्ध संगीतकारांनी चपखलपणे उपयोग केल्याचे जैत रे जैत, सर्जा या चित्रपटांचं संगीत ऐकल्यावर नक्कीच जाणवतं. कोकणामध्ये शिमग्यामध्ये देवी-देवतांच्या पालखी सोहळ्यामध्ये ढोल-ताशांचा सर्रासपण वापर आढळून मेतो.
ढोलकी, ढोलकं याच वर्गातील पण थोडसं आकाराने मोठं असं ढोल हे एक ताल वाद्य आहे. एका लाकडी पोकळ ओंडक्यावर दोन्ही बाजूला जनावराचं, विशेषतः म्हशीचं अथवा रेड्याचं कातडं लावलं जाऊन, हे वाद्य तयार होतं. ज्याच्या एका बाजूच्या चामड्यावर काळ्मा रंगाची शाई (गोंद) लावलं जातं व त्याला लाकडी काठीने (टिपरू) वाजवलं जातं, त्याला ठोक्याची बाजू म्हणतात. तर दुसर्या बाजूला हाताच्या पंजाने वाजवलं जातं, त्याला थापीची बाजू असे म्हणतात. कालांतराने लाकडाची जागा एल्मूमिनिमयने घेतली व चामड्याची जागा फायमबरने घेतली. हल्ली अशाच प्रकारचे ढोल सर्वत्र आढळून मेतात. परंतू, असे असले तरी, आजही काही पथकांनी चामड्याच्मा ढोलाची परंपरा कायम ठेवली आहे, किंबहूना ती त्यांची ओळख ठरलेली आहे.
ताशा हे पूर्वी मातीच्या भांड्यावर चामडं लावून वाजवामयं छोट वाद्य होतं. परंतू, कदाचित मातीचं भांडं सांभाळायला कठिण जात असावं म्हणून, कालांतराने त्याची जागा तांब्याच्या भांड्याने घेतली असावी. मुलतः ताशा हे तसं कर्कश वाद्य. पण त्या वाद्यावर एखाद्या कसलेल्या ताशा वादकाचे हात पडल्यावर, हेच कर्कश वाद्य श्रवणीय होतं.
पनवेलसह मुंबई-ठाण्यात ऐवढेच नव्हे तर पुणे आणि नाशिकमध्ये असंख्य ढोल-ताशा पथकांनी ही परंपरा जोपासली आहे. त्यात खारीचा वाटा पनवेलमधील अनेक ढोल पथकांचा आहे. ब्रह्मा ढोल पथक वाद्य संस्कृती टिकवत असून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करीत आहे. त्यातुनच पनवेल रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाला हातभार लावला होता.
हल्ली ढोल-ताशा पथकाला नागरिकांकडून बॅण्डवाले म्हणून हिणवलं जातं, काही तर ध्वनी प्रदुषण होतं म्हणून या ढोल ताशांवर बंदी आणा म्हणून बोलतात. चालायचंच. व्यक्ती तितक्या प्रकृती ही म्हणं आहेच. पण अशा लोकांशी वाद घालण्यापेक्षा त्यांना या अस्सल मराठी मातीतील वाद्यांची ओळख व्हावी व त्यामागील ऐतिहासिक वारसा व संस्कृतीची माहिती करुन देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातूनच महाराष्ट्राच्या मातीतील, शिवरायांच्या इतिहासाशी नाळ जोडणारं, महाराष्ट्राच्या संस्कृतीत वाढलेलं हे वाद्य महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतात भविष्यात नक्कीच वाजू लागेल.
कधीकाळी ढोल ताशांचा तो गजर तो कैफ फक्त पुण्यात होता. आता हळूहळू सर्वत्र तो ताल धरु लागलाय. ही परंपरा केवळ भारतातच नव्हे तर भारता बाहेरही पसरत आहे. दोन महिन्यांपूर्वी आपल्या राज्यातील एक ढोल पथक अमेरिकेत जाऊन त्यांनी तिथे आपली कला सादर करुन ढोल-ताशांचा गजरात अमेरिकेतील भारतीयांसह पाश्चात्यांनाही ताल धरायला लावला होता. हे ढोल-ताशा पथक या कलेचे सर्वात मोठे यश म्हणायला हवे.
ढोल ताशाचा जन्म नक्की कधी कुठे झाला, मूळ वाद्य कोणतं होतं, कोणत्या देशात, कोणत्या संस्कृतीत, याबद्दल बरेच संदर्भ मिळतात. पर्शियन संस्कृतीमधून साधारण पंधराव्या शतकाच्या आसपास ढोल भारतामध्ये पोचला असं मानतात. भारतात तेंव्हा मुघलांचं वर्चस्व होतं. मूळ पर्शिअन मडोहोलफ नावाचं हे चर्म वाद्य विजय नाद करण्यासाठी वाजवलं जात असे किंवा काही विशिष्ट हेतू जाहीर करण्यासाठी देखील ढोलाचा वापर केला जात होता.
युद्ध गर्जनेपासून ते उत्सवाची सुरुवात झाली आहे हे सांगण्यापर्यंत. पंजाब, आसाम, गोवा, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, बंगाल. भारतातल्या जवळपास प्रत्येक राज्याच्या कला प्रकारांमध्ये ढोलाचं महत्व मोलाचं आहे. भांगडा, पोंगल, शिमगा, गरबा, दुर्गापूजा, दांडिमा, कव्वाली. अशा किती तरी समूह नृत्मांमध्ये किंवा उत्सवांमध्ये ढोलाचं स्थान मध्यवर्ती आहे. किंबहुना, ढोलाच्मा बेभान तालाशिवाय आपण उत्सवांची कल्पनाही करू शकत नाही. देशाच्मा दुर्गम भागात राहणारे आदिवासी! दिवसभर कष्ट केल्यावर रात्री ढोलावर थाप पडता क्षणी, बेभान तालावर पाम थिरकणारच.
महाराष्ट्रमध्ये मुख्यत्वेकरून सार्वजनिक उत्सवांसाठी ढोल वाजवला जातो आणि तो देखील आपल्या आवडत्या गणेशोत्सवामध्ये. शिवाजी महाराजांनी कसबा गणपतीला मानाचा राजाश्रम दिला. पेशव्यांच्या काळात हा मान राखला गेला. लोकमान्यांनी विशिष्ट हेतू ने सार्वजनिक गणेशोत्सवाचा पायंडा पडून दिला. सणाच्या, उत्सवाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र यावं, एकी वाढावी, समाजासाठी काम उभं राहावं असा त्यामागचा हेतू होता.
स्वातंत्र्म संग्रामाच्या काळात, उत्सवाच्या निमित्ताने का होईना, सामान्य माणसाला एका समान पातळीवर आणता आलं ते काही अंशी गणेशोत्सवामुळे! गणपती बाप्पांना प्रतिस्थापित करताना आणि निरोप देतानासुद्धा, ढोल-ताशाचा गजर अनिवार्य! या बेभान गजराशिवाय गणेशोत्सव अपूर्ण ठरतो. आधुनिक संगीताला सहज मागे टाकेल अश्या ढोल-ताशाच्या तालात धुंद होण्याची संधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आली आहे. त्यात नक्कीच सहभागी व्हा!
मिरवणूक म्हटली की डीजेचे प्रस्थ… मोठमोठ्या स्पीकर्सवर लावलेली गाणी आणि त्यावर नाचणारी तरुणाई! ढिंचॅकचे आवाज आणि त्यावर चलतीतील गाणी… गणपतीत तर त्यांच्या एकसुरी आवाजाचा उच्छाद वाटू लागतो. त्यामध्ये मराठी मावळ वाद्य ढोल-ताशांचा ताल मनाला नक्कीच भावतो. त्माचा आनंद घ्या आगामी सण-उत्सवासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!